राणा दांपत्याच्या अटकेनंतर भाजप आक्रमक

खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

Update: 2022-04-23 14:57 GMT

राज्यात दोन दिवसांपासून हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. त्यातच राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यात वातावरण तापले होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राणा दांपत्याने अखेर माघार घेतली. तर त्यानंतर् राणा दांपत्याला अटक करण्यात आली. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

राणा दांपत्याच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटले की, महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना व्यथित करणाऱ्या आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड, आरोपीला अटक नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला मात्र गुन्हा दाखल झाला नाही. महिला लोकप्रतिनिधीला 20 फुट गाडण्याची भाषा करण्यात आली. मात्र त्याची दखलही घेतली नाही. त्याबरोबरच हनुमान चालीसा पठन करण्यासाठी राणा दांपत्य येतात तर त्यांना थेट अटक केली, असे फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटले आहे.

तसेच पुढे फडणवीस यांनी म्हटले आहे की, इतकी दंडुकेशाही, इतका अहंकार? इतका सत्तेचा माज? इतका द्वेष? सरकारच करणार हिंसाचार एवढी तुमची मर्दुमकी? असे फडणवीस म्हणाले. त्याबरोबरच सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या. जनता सर्व पाहते आहे. निव्वळ लज्जास्पद अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. तसेच लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला. लोकशाहीचे गाऱ्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणा दांपत्याच्या अटकेवर प्रतिक्रीया देतांना महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेची परिस्थिती पुर्ण बिघडली असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर टीका केली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राणा दांपत्याच्या अटकेवर प्रतिक्रीया देतांना म्हटले की, राणा दांपत्याला अटक केल्याबद्दल राज्यातील रावणराज्याचा निषेध...तसेच घोटाळेबाज उध्दव ठाकरे सरकारचे दहन होण्याच्या शक्यतेमुळे घाबरले आहे. त्यामुळे रात्री वा मी खार पोलिस स्टेशनला भेट देण्यासाठी जाणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

Tags:    

Similar News