राज्यात मागील जवळपास दीड ते दोन महिन्यांपासून राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाला मिळणार यासंदर्भातली मोठी उत्कंठा सगळ्यांनाच लागली होती आता मात्र निवडणूक आयोगाच्या वतीने पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोग सुध्दा यासंदर्भात आपलं उत्तर लवकरच देणार आहे
खरंतर प्रत्येक मंगळवारी अजित पवारांची सर्व आमदारांसोबत यासंदर्भात बैठक होत असते, सर्व जे आमदार आहेत ते आता देवगिरी निवासस्थानी आहेत आणि याच ठिकाणाहून ही बातमी आल्याची समजतेय.
सध्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे दिल्लीमध्ये आहेत तसेच शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील दिल्ली मध्ये आहेत अशा सगळ्या घटना घडत असताना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाला भेटेल हा एक मोठा प्रश्न होता. कारण राज्यसभेच्या निवडणूका जवळ आलेल्या आहेत तत्पुर्वीच एक महत्वाचा निर्णय अजित पवार गटाला मिळाल्याचं पहायला मिळतंय. पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणत्या गटाला भेटेल याविषयी राज्यात उत्सुकता आणि चर्चा होती शेवटी अजित पवार गटालाच पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
खरंदर मागच्या अनेक दिवसांपासून शरद पवार गटाकडून सांगण्यात येत होतं की पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळणार नाही ते जाणार आहे असा अंदाज वर्तवला जात होता. अखेर तो अंदाज खरा ठरून अजित पवार गटाला पक्ष आणि पक्षाचं चिन्ह घड्याळ हे मिळालेलं आहे.