पवार साहेबांच्या महाराष्ट्रात भाजप कधीही पाय रोवू शकत नाही – धनंजय मुंडे
उत्तर प्रदेश, गोवा यासह इतर राज्यातील निकाल काहीही लागले तरी पुरोगामी महाराष्ट्रात भाजपला किंमत मिळणार नाही, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. शरद पवार यांच्या महाराष्ट्रात भाजप कधीही पाय रोवू शकणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. या पदग्रहण सोहळ्या दरम्यान धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.