अनुसूचित जातीच्या वाटेदारावर मालकाचा पाय पडण्यासाठी दबाव, नकार दिला म्हणून धान्याचा वाटा नाकारला...

Update: 2021-06-25 15:53 GMT

वाट्याने (बटाईने) शेती करणाऱ्या अनुसूचित जातीतील व्यक्तीवर जमीनदाराच्या पाया पडण्याची सक्ती केल्याची घटना उत्तप प्रदेशमध्ये समोर आली आहे.

वाट्याने शेती करणाऱ्या एका व्यक्तीने जमीनदारावर आरोप केला आहे की, जमीनदाराने त्याला पाया पडण्याची सक्ती केली. मात्र, मजूर शेतकऱ्याने याला विरोध केल्याने जमीनदाराने त्या व्यक्तीला शिव्या दिल्या तसंच जातीवाचक शब्दांचा वापर करत मजूर शेतकऱ्याचा अर्ध उत्पन्न देण्यास नकार दिला.

वर्षभर केलेल्या मेहनतीनंतरही उत्पन्न न मिळाल्याने शेती करणाऱ्या मजुराच्या मुलीच्या लग्नाला पैसे मिळाले नाही. त्यामुळं या मुलीचं लग्न देखील तुटलं आहे. आता, या प्रकरणात पोलिस अधिक्षकांनी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना कबरईच्या मकरबाई गावची असल्याचं सांगितलं जात आहे. या गावात राहणारे एक शेतकरी वाट्याने शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

गुरुवारी, 24 जूनला सदर शेतकऱ्याने पोलिस अधीक्षक सुधा सिंग यांच्याकडे तक्रार केली की, त्यांनी गावच्या राजपूत कुटुंबाची जमीन वाट्याने कसण्यासाठी घेतली होती. मजूर शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्यांच्या पत्नी व मुलांसहित दिवसरात्र शेताची देखभाल केली. 12 एप्रिल रोजी त्यांनी गहू व हरभरा मळणी केली होती. मात्र, १३ एप्रिल सदर शेतकऱ्याने पीकातील वाटा मागितला असता, जमीनदारांने त्यांना शिवीगाळ करत जातीय शब्द वापरले.

त्यानंतर वारंवार विनवण्या केल्यानंतरही पंचायत समितीच्या निवडणूका झाल्यानंतर धान्याच्या वाटण्याचं पाहू असं सांगितलं. मात्र, जमीनदाराने पीकाचा वाटा तर दिलाच नाही. मात्र, पिडीत कुटुंबीयांना पाया पडण्यासाठी दबाव टाकत राहिल्याचं सदर शेतमजूराचं म्हणणं आहे.

Tags:    

Similar News