केंद्र सरकाने (Modi Sarkar) दुग्धजन्य पदार्थ (milk products) आयात (import)करण्याच्या धोरणावर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध केलाय, सरकारने विदेशातून दुग्धजन्य पदार्थ ज्या दिवशी आयात करतील तो 'दिवस काळा दिवस' (Black Day) असेल अशी संतप्त भावना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आहेत. केंद्र सरकारने शेती पूरक असलेला दूध व्यवसायाला चालना देण्याऐवजी
संकटात नेत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मॅक्स किसानशी (MaxKisan) बोलतांना दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्राच्या या निर्णयाला विरोध केला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी..