कोकणात एसआरटी (SRT) शेतीचा ट्रेंड
कोकणात केली जात आहे एस .आर .टी. पद्धतीची आधुनिक रूपातील भात शेती;
सध्या कोकणामध्ये शेतीला पूरक असे पर्जन्य होत असताना दिसत आहे. शेतीची कामे आता जोरदारपणे चालू आहेत. आज कोकणामध्ये पारंपारिक व आधुनिक पद्धतीने भात शेती केली जाते, आधुनिक पद्धतीने भात शेती करत असताना शेतकरी विविध मार्गाने शेतीमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोशल मीडियाचा वापर करून एस आर टी पद्धतीचा अवलंब लंब केला जात आहे. या शेती पद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढत असते त्याचबरोबर पुरेशा मनुष्यबळात कामे होत असतात नांगरणी ऐवजी यंत्राच्या सहाय्याने वाफे पद्धतीने जमिनीची उकळ करून त्यामध्ये आधुनिक पद्धतीने बियाणे टाकून पेरणी केली जाते. विशिष्ट कालावधीनंतर भाताच्या लोंब्या मोठ्या झाल्यानंतर त्याची तोड केली जाते यामध्ये दरवर्षी मातीची उकळणी करण्याची गरज भासत नाही, असे भात उत्पादक शेतकरी मोरेश्वर गुरव म्हणाले पहा MaxKisan चा रिपोर्ट.