मजुरांची टंचाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बेजार
मजुरांची टंचाई व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत;
चोपडा तालुक्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असते. सध्या कापूस वेचणीला आलेला आहे. परंतु मजुरांच्या टंचाईमुळे शेतात कापसाच्या झाडावर फुटलेला कापूस मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. तालुक्यातील मजूर टंचाईमुळे आदिवासी भागातून मजुर आणले जात आहे. व सात रुपये किलोने कापूस वेचणी सुरू आहे. एक मजूर दिवसभरात 50 ते 70 किलो कापूस वेचत असल्याने मजूर 300 ते 500 रुपये पर्यंत रोज पडत आहे. सायंकाळी वेचलेला कापूस मोजल्यानंतर लगेच मजूर पैसे घेत असल्याने शेतकऱ्यांना पैशांची जुळवाजुळव देखी ल करावी लागत आहे. आधीच कापसाला भाव नाही त्यानंतर मजुरांची टंचाई, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक संकटातून शेतकरी राजा जाताना दिसत आहे.