देशात गेल्या ७० वर्षात विकास झाला नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करत असतात. पण गेल्या ७० वर्षात सार्वजनिक उद्योगांमुळे देशातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कशी बदलली, मध्यमवर्गाची व्य़ाख्या कशी बदलली याचा इतिहास मांडला आहे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी...एवढेच नाही तर नियोजन आयोग बरखास्त करण्यापासून नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात प्रत्येक वर्षी घातक निर्णय घेतल्याची टीकाही कुमार केतकर यांनी केली आहे. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कुमार केतकर यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून ते नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीपर्यंत देशाच्या स्थितीची आढावा घेतला. प्रत्येकाने ऐकावे असे कुमार केतकर यांचे भाषण....