२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर संसदीय लोकशाहीवर आपला विश्वास दर्शवित आपले धोरण ‘ सबका साथ, सबका विकास ’ असे असणार असल्याचे घोषित केले. मोदींच्या राजकीय भूमिकेत, जागतिकीकरणाच्या काळात निर्माण झालेले नवे आर्थिक धोरण आणि हिंदुत्ववाद यांचे बेमालूम मिश्रण झालेले आहे. विकास हा नियोजनाच्या मार्गाने करावयाचा नसून तो मुक्त आर्थिक उपक्रमशीलतेतून करावयाचा आहे. हा भांडवली विकासाचा मार्ग आहे. नेहरूंच्या विकासाच्या कल्पनेपेक्षा वेगळी अशी विकासाची कल्पना मोदींनी मध्यमवर्गीयांना दाखवली आहे.
नक्की कसा आहे कुमार सप्तर्षींच्या मते मोदी आणि उद्याचा भारत जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडोओ-