कॉर्पोरेट जाहिरात विश्वाचा पाया कुणाच्या जीवावर?

Update: 2020-09-05 09:59 GMT

परवा पानभर जाहिराती बघितल्या; दोन लाखाचा बेड आणि त्यावर तरुण जोडपे लैंगिक हावभाव करत पहुडले आहे; कोणत्याही प्रौढ स्त्री पुरुषाला हे माहित होते की खूप छान सेक्स एन्जॉय करायला नक्की काय लागते ; जेवढा बेड महाग तेवढी कामक्रिडेतील एन्जॉयमेंट जास्त असे काही नसते. मग हे इक्वेशन ग्राहकांच्या डोक्यात जाहिरातवाले कसे बसवू शकतात ?

सकाळी कामावर आणि संध्याकाळी परत घरी लवकर पोचावे म्हणून तुम्ही स्वतःची कार घ्या दुसरी जाहिरात....

पण सर्वानी कार्स घेतल्या तर ट्राफिक जॅम होणार आणि सर्वाना सर्वत्र जायला उशीर होईल हा तर महानगरातील नागरिकांचा नेहमीचा अनुभव. मग हे इक्वेशन ग्राहकांच्या डोक्यात जाहिरातवाले कसे बसवू शकतात ?

अशा जाहिरातींची यादी करता येईल ; ज्यांना थोडे खरवडले की त्यातील च्युतापा लक्षात येईल . आपल्याला वाटते जाहिरातींमुळे कोणी फसत नाहीत, तर तसे ते नाहीये ; रिझल्ट्स मिळणार नसतील तर हजारो कोटी रुपये जाहीरांतींवर खर्च करण्याएवढे कोर्पोरेट्स मूर्ख नसतात.

लहानपणापासून शिक्षणच असे द्यायचे की माणसाची कोणतीही चिकित्सक बुद्धी विकसित होणार नाही. घरापासून , शिक्षकापासून संस्कार असे करायचे की कोणी प्रौढ झाल्यावरदेखील टोकदार प्रश्न विचारणार नाही. धार्मिक कर्मकांडात माणसांना वर्षाचे १२ महिने एव्हडे जखडून टाकायचे की त्याला त्यापलीकडे काही आयुष्य असते याचा विचारही सुचू नये.

या सगळ्या मजबूत पायावर कॉर्पोरटस चे जाहिरात विश्व उभे केले आहे. हा प्रश्न जाहिरात विश्वाचा नाहीय ; त्याच मानसिकतेमधून समाजात , माणसामाणसात विष पेरणारी तत्वज्ञाने रुजतात, तीच मानसिकता भक्तगण तयार करते आणि हुकूमशांना आमंत्रित करते. सगळे बिंदू जोडायला शिकूया ; कनेक्ट डिफरण्ट डॉटस

संजीव चांदोरकर

Similar News