विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपतर्फे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खड़से यांनी आता पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. गेली अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांना डावलून बाहेरुन आलेल्या आणि भाजपविरोधात कारस्थानं केलेल्यांनाच उमेदवारी दिली गेल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
या अन्यायामुळे आपण काहीतरी ठोस निर्णय घ्यावा असा आग्रह आपल्याला पक्षातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे, असंही खडसे यांनी सांगितले आहे. आपल्याला इतर पक्षांकडूनही ऑफर आहेत. पण सध्या कोरोनाच्या गंभीर संकटाच्या काळात कोणताही निर्णय घेणार नाही. पण कोरोनाचे संकट एकदा मिटले की मग आपण पुढील वाटचालीबाबत समर्थकांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे खडसे यांनी सांगितले आहे.