सध्या करोना महामारीत अनेक गैरसमज, संभ्रम समाजात मोठ्याप्रमाणावर पसरत आहे. कोरोनावर उपचार म्हणून वाफ घ्यावी. असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजे या मेसेज मध्ये डॉक्टर स्वत: वाफेने बरे झाले असल्याचं म्हटलं आहे. सध्या हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून कोरोना वाफेने बरा होतो का? हे लोक गुगल वर सर्च करण्याचं प्रमाण अधिक आहे. यावरुन लोकांच्या मनामध्ये मोठे प्रश्न निर्माण झाल्याचं लक्षात येतं.
अशा प्रकारे मेसेज सोशल मीडिय़ावर मोठ्य़ा प्रमाणात व्हायरल झाले आहेत. एका मेसेज मध्ये चायनिज तज्ञांचा हवाला देण्यात आला आहे.
एक फेसबूक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वाफेनं कोरोना बरा होतो असं सांगण्यात आलं आहे.
'या' व्हायरल मेसेज मुळे काय होऊ शकते?
काही रुग्ण लागण झाल्यास घरगुती उपाय म्हणून अशा प्रकारे घरीच इलाज करण्याचा प्रयत्न करु शकतात. मात्र, यामुळे खरंच कोरोना बरा होतो का? अशा प्रकारे घरीच ईलाज केल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो का? जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात माहिती दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
दमट वातावरणात कोरोना पसरतो का?
कोरोना कोणत्याही वातावरणात पसरतो. जर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या तुम्ही संपर्कात आल्यास आणि योग्य ती काळजी घेतली नसल्यास कोरोना कोणत्याही वातावरणात पसरतो असं Who ने केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
गरम पाण्यानं अंघोळ केल्यास कोरोना बरा होतो का?
या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने ट्विट केलं असून अशा प्रकारे कोरोना बरा होत नसल्याचं म्हटलं आहे.
मॅक्समहाराष्ट्र ची फॅक्ट चेक टीम वरील सर्व दाव्यांचा आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीच्या आधारे या निष्कर्षा पर्यंत पोहोचली आहे की, कोरोना वाफेने, गरम पाण्याने अंघोळ केल्यानं बरा होत नाही. रुग्णांना दवाखान्यात जाऊनच उपचार घेणं गरजेचं आहे.