मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही. इंग्लंड मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विराटशतक तर दूर अर्धशतकही करू शकला नाही.
त्यातच तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट चांगली कामगिरी करू शकेल अशी आशा होती मात्र, पहिल्या डावात तो केवळ 7 धावा करुन बाद झाला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात केवळ 78 धावा केल्या.
मागील 50 आंतरराष्ट्रीय डावांत विराट एकही शतक करू शकला नाही. त्यामुळे 50 सामन्यात एकही अर्धशतक न केल्याने, त्याच्या नावे चांगली कामगिरी न करण्याचे अर्धशतक तेवढे झाले आहे.
विराटने नोव्हेंबर, 2019 मध्ये बांग्लादेश विरुद्ध झालेल्या डे-नाइट कसोटी सामन्यात शेवटचं शतक केलं होतं. त्यानंतर त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त होत होती. पण लीड्स येथील तिसऱ्या कसोटीतही विराटच्या पदरी निराशाच पडली होती.
2020 पासून आतापर्यंत विराटने केवळ 3 कसोटी सामान्यात अर्धशतकं केले आहे.