विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातला वाद मिटला? अफगाणिस्तानच्या खेळाडूविरुद्ध नारेबाजी बंद.

Virat Kohli and Naveen Ul Haq: भारताने विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर आठ गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. या सामन्यात विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील भांडण मिटले. जुना वाद मागे टाकून दोन्ही क्रिकेटपटूंनी एकमेकांना मिठी मारली.;

Update: 2023-10-12 11:10 GMT

विश्वचषक २०२३ मधे कांगारुला नमवत भारताने विजई सालामी दिली या नंतर भारतीय संघाचा दुसरा सामना अफगनिस्थान विरुद्ध पार पडला यात रोहीत शर्मा ची शतकीय खेळी तर पाहण्यासारखी होतीच, पण या सामन्यात अजून एक मोठी पाहण्यासारखी गोष्ट ठरली ती म्हणजे विराट कोहली आणि नवीन उल हक. आयपीएल २०२३ मध्ये या दोन्ही खेळाडूंमधील झालेला वाद क्वचितच कोणी विसरलं असेल. पण या विश्वचषकातील सामन्यात या दोघांनीही आपले वाद मिटवत एकमेकांना मिठी मारली. याचा व्हिडीओ प्रसार माध्यमांमधे मोठ्या प्रमानात वायरल झाला, पण हे नेमकं कसं घडलं आणि या दोघांमध्ये काय बोलणं झालं याचा सामन्यानंतर खुद्द नवीनने खुलासा केला.

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याने सांगितले की, त्याच्या आणि भारताचा दिग्गज विराट कोहली यांच्यात मैदानाबाहेर कोणताही वाद झाला नाही. बुधवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यादरम्यान कोहली फलंदाजी करत असताना त्याने नवीनला मिठी मारली आणि एकमेकांमधील मतभेद संपवले. इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या हंगामात लखनौमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान नवीन आणि कोहली यांच्यात बाचाबाची झाली होती.

विश्वचषकाच्या सामन्यात दोघेही आमनेसामने आले तेव्हा कोहलीने या खेळाडूला मिठी मारली. सामन्यानंतर नवीन म्हणाला, 'माझ्यात आणि कोहलीमध्ये जे काही घडले ते मैदानातच होते. मैदानाबाहेर आमच्यात वाद नव्हता. लोकांनी आणि माध्यमांनी हे प्रकरण मोठे केले. त्यांना फॉलोअर्स वाढवण्यासाठी अशा केसेसची गरज आहे.'

तो म्हणाला की कोहलीने त्याला भूतकाळात जे घडलं ते विसरून जाण्यास सांगितले. हा वेगवान गोलंदाज म्हणाला, 'कोहलीने मला सांगितले की आपण त्या गोष्टी मागे सोडल्या पाहिजेत. मीही त्याला उत्तर दिले, 'हो, या गोष्टी संपल्या आहेत.' जेव्हा नवीन विश्वचषकाच्या सामन्यात फलंदाजीसाठी आला तेव्हा प्रेक्षकांनी 'कोहली-कोहली' असा जयघोष सुरू केला. नवीन गोलंदाजी करतानाही हेच घडताना दिसले. कोहली आणि नवीनने मिठी मारल्यानंतर प्रेक्षकांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूविरुद्ध नारेबाजी करणे बंद केले.


विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातला वाद मिटला? अफगाणिस्तानच्या खेळाडूविरुद्ध नारेबाजी बंद. 

Tags:    

Similar News