श्रीलंकेचा नाम्बियावर 7 विकेट्सनी विजय; 'त्या' कॅचची सोशल मीडियावर चर्चा
T20 World Cup: टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सामन्यांना सुरुवात होऊन दोनच दिवस झाले असले तरी दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. काल(18 ऑक्टोबर) दुपारच्या सामन्यात आयर्लंडचा गोलंदाज कर्टिस कँफर (Curtis Campher) याने नेदरलँडच्या 4 फलंदाजाना सलग 4 चेंडूवर बाद केले. त्यानंतर सायंकाळच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार याने नामबियाच्या एका फलंदाचा पकडलेला झेल हा तर डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. त्याने ज्याप्रकारे हा झेल घेतला तो पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. झेप घेत घेतलेल्या या झेलाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या गोलंदाजानी अगदी योग्य ठरवत नामबियाच्या संघाला अवघ्या 96 धावांत सर्वबाद केलं. त्यांच्याकडून केवळ क्रेग विल्यम्स 29 आणि इरॉसमस 20 या सर्वाधिक धावा केल्या. तर श्रीलंका संघाकडून थिकशानाने 3 तर एल कुमारा आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. करुनारत्ने आणि चमिरा यांनी 1-1 विकेट घेतला.