T-20 World cup : भारतीय संघाने सराव करण्यास दिला नकार, पण नेमकं काय आहे कारण?

ऑस्ट्रेलियात T-20 World cup स्पर्धा सुरु आहे. दरम्यान भारतीय संघ नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. पण भारतीय संघ का आहे नाराज? जाणून घेण्यासाठी वाचा...

Update: 2022-10-26 06:05 GMT

T-20 World Cup या क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ नाराज असल्याची माहिती BCCI च्या सुत्रांनी दिली आहे. तसेच भारतीय संघाने सराव करण्यास नकार दिल्याचेही म्हटले जात आहे.

गुरूवारी भारतीय संघाचा सामना सिडनी क्रिकेट मैदानात नेदरलँडशी होणार आहे. त्यापुर्वीच नाराजीनाट्य समोर आले आहे. BCCI च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या जेवणावरून भारतीय संघ नाराज आहे. खेळाडूंना गरम जेवण दिले जात नाही तसेच फक्त सँडविच दिले जात असल्याचीही तक्रार खेळाडूंनी ICC कडे केली असल्याचे म्हटले जात आहे. कारण विश्वचषकादरम्यान खेळाडूंना जेवण पुरवण्याची जबाबदारी ICC कडे असते.

भारतीय संघासाठी दिलेल्या हॉटेलपासून सरावासाठी दिलेले मैदान 45 मिनिटांच्या अंतरावर असल्याने भारतीय संघाने सरावासाठीही नकार दिला आहे.

पुढचा सामना नेदरलँडशी

भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पुढचा सामना थेट नेदरलँडशी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र त्यापुर्वीच भारतीय संघ नाराज असल्याचे समोर आल्याने आणि सराव करण्यास नकार दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Tags:    

Similar News