#RohitSharma रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय, 200 धावा केलेल्या ईशान किशनला केले संघातून बाहेर
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (RohitSharma) एक धक्कादायक निर्णय घेत सर्व क्रिकेट चाहत्यांना अचंबित केले आहे. रोहितने बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) 200 धावा ठोकलेल्या सलामीवीर ईशान किशनलाच (Ishan Kishan) संघातून बाहेर केले आहे. त्याने घेतलेल्या या निर्णयावर सोशल मिडियातून उलट-सूलट प्रतिक्रिया फॅन्सकडून येत आहेत.
भारत व श्रीलंका तीन सामन्यांची वनडे सीरीज आज (10 जानेवारी) पासून गुवाहाटीतून सुरु होत आहे. या सीरीजमध्ये ईशान किशनची जागा निश्चित असल्याचे क्रिकेट जाणकारांचे म्हणणे होते. कारण, ईशानने 10 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ताबडतोब फलंदाजी करुन 131 चेडूवर 210 धावा ठोकल्या होत्या. या सामन्यात ईशानने 10 षटकार व 24 चौकार लगावले होते. त्याच्या या दमदार फलंदाजीमुळेच ईशानचे भारतीय संघातील स्थान पक्के झाल्याचे मानले जात होते. पण, कर्णधार रोहित शर्माने ईशानलाच संघातून बाहेर करुन सर्व क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ईशानच्या जागी शुभमन गिल रोहितने ईशानच्या जागी शुभमन गिलची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. आज होणाऱ्या गुवाहाटीतील या सामन्यात ईशानच्या जागी शुभमन खेळतांना दिसणार आहे.
Captain @ImRo45 was all praise for youngsters @ShubmanGill & @ishankishan51 ahead of the #INDvSL ODI series starting tomorrow 👌🏻👌🏻@mastercardindia pic.twitter.com/vlZyeGpChP
— BCCI (@BCCI) January 9, 2023
सोशल मिडियातून रोहितवर टीकेची झोड रोहित शर्माने घेतलेल्या या निर्णयावर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती व रोहितवर टीकेची झोड नेटकऱ्यांनी उठवली आहे. सोशल मिडियातून या निर्णयाबद्दल संताप व्यक्त करत असे निर्णय घेतांना लाज वाटली पाहिजे, असे एका ट्विटर युझरने म्हटले आहे.