पंतप्रधान मोदींकडून पदक विजेत्या खेळाडूंसाठी ‘डिनर’, ऐतिहासिक कामगिरीचेही केले कौतूक
सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकाचं शतक पूर्ण केलं आहे. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून खेळाडूंचे कौतूक केले आहे.;
आशियाई गेम्समध्ये भारतीय एथलिट्सने जोरदार कामगिरी करत पदकांचं शतक पूर्ण केलं. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून खेळाडूंचे कौतूक केलं. तसेच तुम्ही ऐतिहासिक कामगिरी केल्याचं म्हणत मोदींनी खेळाडूंसाठी डिनरचं आयोजन केलं आहे. तसेच खेळाडूंसोबत संवाद साधण्यासाठी आणि डिनरसाठी उत्सुक असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
आशियाई गेम्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 25 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे या खेळाडूंचे देशभर कौतूक होत आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, आशियाई गेम्स 2023 मध्ये भारताने मोठी कमाई केली आहे. भारतीय लोक खेळाडूंच्या कामगिरीने रोमांचित झाले आहेत. आपण 100 पदकांचा उल्लेखनीय टप्पा पूर्ण केला आहे. मी आपल्या अभूतपुर्व कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो. त्यांनी कठिण परिस्थितीत हे मोठं यश मिळवलं आहे.
भारतीय खेळाडूंनी विस्मयकारक प्रदर्शन करत इतिहास रचला आहे. त्यामुळे माझं मन भरून आलं आहे. मी 10 तारखेची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण 10 तारखेला मी खेळाडूंना मेजवानी देणार आहे आणि खेळाडूंसोबत संवाद साधणार आहे.