भारतीय संघ व मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी...
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आयपीएल २०२३ ( IPL 2023 ) च्या स्पर्धेला प्रमुख भारतीय खेळाडू मुकणार आहेत.
भारतीय क्रिकेट खेळाडू जसप्रीत बुमराह ( jasprit bumrah ) आयपीएलमधून पुनरागमन करेल, असा अंदाज होता. मात्र त्याला झालेल्या दुखापतीमधून सावरण्यासाठी बराब वेळ लागणार आहे, अशी माहिती क्रिकबजने दिली आहे. २०२२ त्या सप्टेंबर मध्ये बुमराह हा भारतीय संघाकडून अखेरचा खेळाला होता. त्यानंतर आजपर्यत त्याच्यावर पाठीच्या दुखापतीसाठी उपचार सुरु आहेत. भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वन-डे मालिकेसाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने फिट-आऊट सर्टिफ्केट अद्यापही दिलेले नाही. बुमराहला अजून पूर्णपणे बरे होण्यासाठी खुप वेळ लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाहीए. गेल्यावेळी अशीच घाई केल्यामुळे त्यावा टी-२० वर्ल्ड कप ( T-20 WORLD CUP ) स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
आयपीएल २०२३ ( IPL 2023 ) च्या यंदाच्या सिजनमध्ये अनेक भारतीय खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना यंदा सिजन खेळता येणार नाही, अशी दिसून येत आहे.
आयपीएल २०२३ ( IPL 2023 ) साठी मुंबई इंडियन्सचा ( MUMBAI INDIANS ) संघ हा पुढीलप्रमाणे असणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड, डेवॉल्ड ब्रेव्हिस, ह्रतिक शोकिन, अर्जून तेंडूलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल.
मुंबई इंडियन्स संघाचे वेळापत्रक-२०२३ ( MUMBAI INDIANS SCHEDULE IN IPL 2023 )
२ एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू- सायंकाळी ७.३० वा. पासून
८ एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई- सायंकाळी ७.३० पासून
११ एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली- सायंकाळी ७.३० वा. पासून
१६ एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई- दुपारी ३.३० वा. पासून
१८ एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैद्राबाद- सायंकाळी ७.३० पासून
२२ एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई- सायंकाळी ७.३० पासून
२५ एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद- सांयकाळी ७.३० पासून
३० एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई सायंकाळी ७.३० पासून
३ मे- पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहली- सायंकाळी ७.३० वा. पासून
६ मे- चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई- दुपारी ३.३० वा.पासून
९ मे- मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, मुंबई- सायंकाळी ७.३० वा. पासून
१२ मे- मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई- सायंकाळी ७.३० वा. पासून
१६ मे- लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स, लखनौ- सायंकाळी ७.३० वा. पासून
२१ मे- मुंबई इंडीयन्स वि. सनरायझर्स, हैदराबाद, मुंबई- दुपारी ३.३० वा. पासून