IPL 2023 गुजरातचा खणखणीत विजय, मुंबईच्या हाती निराशा

काल IPL २०२३ च्या पात्रता फेरीत मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्सचा(Gujarat Titans) सामना अहमदाबाद (Ahmadabad) मधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) मध्ये रंगला.

Update: 2023-05-27 07:58 GMT

मुंबई ने नाणेफेकी जिंकून गोलंदाझी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बाजूने गेला नाही, गुजरात ने पहिला फलंदाजी करताना २३३ धावा जोडल्या, आणि मुंबई समोर २३४ धावांचा विशाल लक्ष ठेवल होते. त्यात नायक ठरला तोच म्हणजे भारतीय क्रिकेटचा ' प्रिन्स ' म्हणून ओळखला जाणारा शुभमन गिल (shubhman gill) शुभमन ने ६० चेंडूंचा सामना करून १२९ धावा जोडल्या त्यात ७ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता.

Full View


शुभमच्या साथीला साई सुदर्शन ने देखील ४३ धावा जोडल्या. चेज करताना मुंबई इंडियन्सचे फलंदाज एका मागे एक बाद झाले, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि कॅमेरॉन ग्रीन ने मुंबईची गाडी सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण मोहित शर्मा आणि जोशुआ लिटीलने एका मागे एक गाडी बाद करून मुंबईच्या सगळ्या संभावना संपवून टाकल्या. मोहित शर्माने फक्त १० धावा देऊन ५ गडी बाद केले आणि तोच गुजरातच्या गोलंदाजी क्रमाचा एक्का ठरला. शुभमन गिल IPLच्या प्ले-ऑफ्समध्ये शतक मारणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

रविवारी गुजरात टायटन्सचा सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) सोबत अहमदाबादमध्ये होईल. हा IPL २०२३ सामना असून चाहत्यांना उत्सुकता आहे कि चेन्नई ५ व्यांदा जिंकेल कि गुजरात सलग दुसऱ्यांदा जिंकेल हे उद्या होणाऱ्या आयपीएल मॅचमध्ये पहाव लागेल.

Tags:    

Similar News