कोलकाता नाइट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सवर रोमहर्षक विजय

Update: 2021-10-14 01:57 GMT

IPL 2021: कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) रोमहर्षक विजय मिळवला आहे. DC च्या गोलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली, त्यात भर म्हणून ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यामुळे दिल्लीला हार पत्करावी लागली. दिल्लीनं १८ व १९ षटकांत चार धावा देताना दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला. आर अश्विननं २० व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत दिल्लीच्या बाजूनं सामना फिरवला, परंतु राहुल त्रिपाठीच्या एका उत्तुंग फटकेबाजीने सर्व चित्र बदलले. कोलकातानं फायनलमध्ये एन्ट्री मारून चेन्नई सुपर किंग्ससमोर ( CSK) तगडे आव्हान उभं केलं आहे. २०१२ मध्ये कोलकाता व चेन्नई असा फायनल सामना झाला होता आणि आता पुन्हा त्यांच्यात जोरदार लढत होणार आहे.

श्रेयस अय्यर व रिषभ पंत याच्या आधी मार्कस स्टॉयनिसला फलंदाजीला पाठवण्याचा DC चा निर्णय फसला. स्टॉयनिसने अतिशय सुमार कामगिरी केली. सलामीवीर पृथ्वी शॉ याला १८ धावा करता आल्या.  मार्कस स्टॉयनिस १८ , शिखर धवन ३६, रिषभ पंत ६, शिमरोन हेटमायरला १७ धावा करता आल्या. एकूणच कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. हेयमायर जीवदान मिळूनही केवळ १४ धावा करता आल्या. आणि तो धावबाद झाला. अय्यर ३० धावांवर नाबाद राहिला. दिल्लीला २० षटकांत कशाबशा ५ बाद १३५ धावाच करता आल्या. सुनील नरीननं ४ षटकांत २७ धावा दिल्या, तर ल्युकी फर्ग्युसननं २६ धावांत १ विकेट घेतली. शाकिबनं ४ षटकांत २८ धावा दिल्या. वरुण चक्रवर्थीनं ४ षटकांत २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.  

वेंकटेश अय्यर व शुबमन गिल यांनी KKR ला सावध सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. गिल एका बाजूनं विकेट टिकवून खेळत होता, तर अय्यर उत्तुंग फटकेबाजी करत होता.

Tags:    

Similar News