India vs South Africa 2nd T20I : टीम इंडियासमोर अंतिम ११ बाबत अडचणींच अडचणी
बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा समोर संघ नियोजनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पूर्वसंध्येला येथील शहरातील आणि विशेषतः बारसापारा क्रिकेट स्टेडियमच्या आसपासची वाहतूक कोंडी झाली होती. भारताच्या संघ नियोजनाची स्थिती सध्या अगदी सारखीच आहे.
आगामी T20 विश्वचषक जेमतेम दोन आठवडे बाकी असताना, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेचा विचार न करता भारतीय संघाचं सारं लक्ष हे विश्वचषकाकडे लागल्याचं दिसुन य़ेत आहे. आयसीसी च्या बैठकीपूर्वी भारतीय संघ उभा राहण्याची अपेक्षा होती पण भारतीय गोलंदाजीचा कणा असलेल्या जसप्रीत बुमराहच्या दुखापतीने अनिश्चितता वाढवली आहे.
जर बुमराह विश्वचषकातून बाहेर पडला तर भारताला विष्वचषकात त्याची उणिव मोठ्या प्रमाणात भासणार आहे, सध्या बुमराह हा भारतीय संघाच्या गोलंदाजीचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिवाय गेल्या काही काळात बुमराहच्या दुखापतींमध्ये वाढच होत चालली आहे.
तुर्तास रविवारी २ ऑक्टोबरला भारत विरूध्द दक्षिण अफ्रिका दुसरा सामना रंगणार आहे. यासामन्यासाठी अंतिम ११ खेळाडू निवडण्याचं आव्हान कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहूल द्रविड यांच्यासमोर असणार आहे.
पहिल्या सामन्यात के एल राहुल ला हरवलेला सुर गवसला होता तर सुर्यकुमार यादवने तो भारतीय फलंदाजीचा भरवश्याचा गडी असल्याचं पुन्हा एकदा सिध्द केलं आहे. गुवाहाटीचं बारसापारा क्रिकेट स्टेडियम हे लो स्कोअरींग मैदान आहे. त्यामुळे सुर्यकुमार वर पुन्हा एकदा संघाची भिस्त असणार आहे. गोलंदाजीमध्ये ताकद वाढवण्यासाठी यजमानांनी उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान दिलं आहे. अंतिम ११ मध्ये या दोघांपैकी कुणाला संधी मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
रविवारी संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होणार असून तो स्टार स्पोर्टस वाहिनीवर आपल्याला पाहता येणार आहे तर हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पाहता येणार आहे.
संभाव्य भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक(यष्टीरक्षक), अक्सर पटेल, आर अश्विन, दीपक चहर, हर्शल पटेल, अर्शदीप सिंह