T20 World Cup 2022 : भारताचा नेदरलॅंडवर एकतर्फी विजय; रोहित विराट आणि सुर्या चमकले

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-10-27 11:20 GMT
T20 World Cup 2022 : भारताचा नेदरलॅंडवर एकतर्फी विजय; रोहित विराट आणि सुर्या चमकले
  • whatsapp icon

ICC t20 world cup Australia मध्ये भारताने साखळी फेरीत सलग दुसरा सामना जिंकत उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. दुसऱ्या सामन्याब नेदरलॅंडचा भारताने ५६ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांनी अर्धशतकं झळकावली तर अर्शदीप सिंह, रविचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, भुवनेश्वर कुमार यांनी देखील प्रत्येकी दोन दोन गडी बाद करत विजयात मोलाचा हातभार लावला.


 



सामन्याच्या सुरूवातीला के एल राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तोच जीवनदान मिळालेल्या रोहित ने संधीचं सोनं करत ३९ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ४४ चेंडूत ६२ धावा करत त्याची लय कायम राखली. तर भारताच ३६० डिग्री खेळाडू सुर्यकुमार यादवने फक्त २५ चेंडूत ५१ धावांची तोडफोड खेळी खेळली. तर भारतीय गोलंदाजांनी देखील टिच्चून मारा केल्या मुळे नेदरलॅंडला २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात फक्त १२३ धावा करता आल्या. आणि भारताने हा सामना ५६ धावांनी खिशात घातला. तर २५ चेंडूत ५१ धावा करणार सुर्यकुमार यादव सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.





 


आता भारताचे यापुढचे सामने दक्षिण अफ्रिका, बांग्लादेश आणि झिंबाब्वे या तीन संघांसोबत असणार आहेत. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आणखी किमान २ सामने जिंकणं गरजेचं आहे.


Full View

Tags:    

Similar News