ICC T20 World Cup 2022: रिझवान, सुर्या ते हेझलवुड हे पाच खेळाडू ठरणार महत्वाचे.....

Update: 2022-10-16 06:19 GMT

रविवारी १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया(Australia) येथे टी २० चषकाचा (T20 World Cup) थरार सुरू झाला आहे. सध्या टी २० प्रकारात नंबर १ असलेला खेळाडू मोदम्मद रिजवान (Mohammad Rizwan) हा पाकिस्तान(Pakistan) साठी सर्वाधिक सातत्य असेलला खेळाडू आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारता(India) चा सुर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) आहे. शिवाय श्रीलंके(Sri lanka) चा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा(Wanindu Hasaranga) हा देखील सातत्याने उत्तम गोलंदाजी करत आहे. या स्पर्धेत आपल्याला पुढील पाच खेळीडू आपापल्या संघांसाठी कमाल करताना दिसू शकतात.




1 मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) : जगात नंबर एक असलेला खेळाडू मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानसाठी सर्वाधिक सातत्य दाखवणारा खेळाडू ठरला आहे. मागील वर्षभराच त्याने टी २० क्रिकेट जगतात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या आशिया चषकात सर्वाधिक धावा देखील त्याच्याच नावावर आहेत. रिझवान ला जर सुरवातीच्या षटकांमध्ये बाद केलं नाही तर तो विरोधी संघा साठी कर्दनकाळ ठरू शकतो.


2 सुर्यकमार यादव (Surya Kumar Yadav) : सुर्यकुमार यादव हा सध्या त्याच्या सर्वोच्च फॉर्मात आहे. टी २० रँकिंगमध्ये सध्या तो दुसऱ्या स्थानावर आहे. शिवाय गेल्या वर्षभरात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. यंदाचा विश्वचषक भारतासाठी सुर्यकुमार यादव गाजवणार हे नक्की! मैदान्याच्या प्रत्येक कोपऱ्यात फटका मारण्याची क्षमता असल्यामुळे त्याला भारताचा AB De villiars देखील म्हटलं जातं.


3 वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) : २०२१ मधील टी २० विश्वचषकात सर्वाधिक खेळाडू बाद करणाऱ्या वनिंदू हसरंगावर देखील साऱ्या क्रिकेट विश्वाच्या नजरा लागलेल्या असणार आहे. त्याची फिरकी गोलंदाजी ओळखणं हे भल्या भल्या फलंदाजांना कठीण जात आहे. शिवाय अष्टपैलू खेळाडूंच्या य़ादीत तो पहिल्या दहात राहिलेला आहे.


4 जॉस बटलर (Jos Buttler): २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना गाजवणार खेळाडू जॉस बटलर हा देखील विरेधी संघांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. कारण एकदा का तो त्याच्या फॉर्ममध्ये परतला की गोलंदाजांचा वाईट काळ सुरू झालाच म्हणुन समजा. त्यामुळे इंग्लंडच्या य़ा खेळाडूला स्पर्धेतील कुठलाच संघ दुर्लक्षित करण्याची चुक करणार नाही.


5 जॉश हेजलवूड (Josh Hazlewood) : घरच्या मैदानावर खेळताना ऑस्ट्रेलियाचा हा जलदगती गोलंदाज भल्या भल्यांचे धाबे दणाणून सोडण्याची क्षमता ठेवतो. शिवाय जगात टॉप १० गोलंदाजांपैकी त्याचा क्रमांक पहिला लागतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघासाठी हा खेळाडू फारच महत्वाचा ठरणार आहे हे विशेष!

Tags:    

Similar News