FIFA Club World Cup : रियल माद्रिदने अल-हिलालवर 5-3 असा रोमहर्षक विजय मिळवत ५ व्यांदा पटकावला क्लब वर्ल्ड कप चॅम्पियनचा मुकुट.

मोरोक्को (Morocco)मधिल प्रिन्स मौले अब्देल्लाह स्टेडियम, रबत (Prince Moulay Abdellah Stadium Rabat, Morocco )इथे. पार पडलेल्या फिफा क्लब विश्वचषक फायनल मॅच(Club World Cup final match), मधे स्पॅनिश क्लब रियाल माद्रिद(Real Madrid) ने सौदी अरेबियन (Saudi Arabia)क्लब अल हिलाल (Al-Hilal) वर 5-3 अशी मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे अहे.शनिवार,11 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या या सामन्यात बलाढ्य रियाल माद्रिद ने अल हिलाल वर 5-1 अशी मात केली.

Update: 2023-02-12 14:46 GMT

मोरोक्को मधिल प्रिन्स मौले अब्देल्लाह स्टेडियम, रबत इथं पार पडलेल्या या सामान्य मध्ये व्हिनिशिअस जुनिअर (vinicius junior)ने १३ व्या मिनिटातच गोल करत रिअल माद्रिद ला आघाडी मिळून दिली,त्या नंतर १८व्या मिनिटाला फेडरिको वालवर्डे(Federico Valverde) ने दुसरा गोल करत फरक २-० असा केला .रियाल माद्रिद संघाकडून व्हिनिशिअस जुनिअर आणी फेडरिको वालवर्डे यांनी प्रत्येकी २ गोल ,तर करीम बेंझिमा (Karim Benzima) ने १ गोल केला ,त्या नंतर अल हिलाल संघाकडून मुसा मरेगा (Musa Marega) याने २६ व्या मिनिटाला १ गोल केला तर लुसियानो व्हेट्टो (Luciano Vietto) ने ६३ आणि ७९ व्या मिनिटाला २ गोल केले. मात्र आलं हिलाल संघला जगातल्या सर्वात मोठ्या क्लब पैकी एक असलेल्या रियाल माद्रिद वर विजय मिळवता आला नाही . या विजया सह रियाल माद्रिद ने या स्पर्धेवर ५ वेळा नाव कोरल आहे.त्या खालोखाल आणखी एक स्पॅनिश क्लब बार्सिलोना(Barcelona) ने ३ वेळा हि स्पर्धा जिंकली आहे.

जगप्रसिद्ध फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरण्यात यशस्वी झाल्याने रियाल माद्रिद संघाच सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे .हि स्पर्ध जिंकल्यामुळे संघात आनंदच वातावरण आहे तसेच मागील काही दिवसात खराब चाललेला फॉर्म हि या विजयामुळे सुधारेल असं रियाल माद्रिद संघाचे मॅनेजर कार्लो अंशलोटी (Karlo Anshloti) यांनी म्हटलं आहे आहे .

मागच्या १० वर्षातील स्पर्धेचे विजते संघ -

साल -    देश -      संघ-

२०१२ - Brazil    Corinthians

२०१३ - Germany Bayern Munich

२०१४ - Spain Real Madrid

२०१५ - Spain Barcelona

२०१६ - Spain Real Madrid

२०१७ - Spain Real Madrid

२०१८ - Spain Real Madrid

२०१९ - England Liverpool

२०२० - Germany Bayern Munich

२०२१ - England Chelsea

२०२२ - England Real Madrid

Tags:    

Similar News