DC vs GT IPL 2023 : दिल्ली कॅपिटल चा रोमहर्षक विजय, गुजरातला पाजले पाणी

दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) ने अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली.;

Update: 2023-05-03 02:22 GMT

IPL 2023 च्या सीजनमध्ये मंगळवारी आणखी एक सामना चुरशीचा झाला. यामध्ये गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) दिल्ली कॅपिटल्सने अवघे 131 धावांचे लक्ष दिले होते. मात्र गुजरात टायटन्सला 131 धावांचे लक्षही पूर्ण करता आले नाही.

दिल्ली कॅपिटल्सची प्रथम फलंदाजी करताना मोठी तारांबळ उडाली. अवघ्या 23 धावांमध्ये दिल्लीच्या पाच खेळाडूंची विकेट गेली. त्यानंतर अमन खानने अर्धशतक झळकावत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला अक्षर पटेल (Axar Patel) याने 27 धावांची आणि रिपल पटेलने (Ripal patel) 23 धावांची साथ दिली.

दिल्लीविरोधात गोलंदाजी करतांना इशांत शर्माने (Ishant Sharma) 23 धावांमध्ये 2 विकेट मिळवल्या. तर खलील अहमद (Khaleel Ahmed) याने 24 धावात दोन गडी बाद केले. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यानेही 1 विकेट मिळवली. त्यामुळे दिल्लीची अवस्था दयनिय असतानाही अमन खानच्या खेळीमुळे दिल्लीला 130 धावांचा सन्मानजनक आकडा गाठता आला. मात्र प्रत्युत्तरादाखल खेळीत गुजरात टायटन्सकडून हार्दिक पटेलने (Hardik Patel) 53 चेंडूत 59 धावा केल्या. मात्र हार्दिक पटेलची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

दिल्लीने दिलेले आव्हान पेलताना गुजरात टायटन्सची त्रेधातिरपट उडाली. यामध्ये मोहम्मद शमीने (Mohammed Shami) 11 धावा देत 4 खेळाडूंना तंबूत पाठवले. तर मोहित शर्माने (Mohit Sharma) 33 धावा देत 2 विकेट मिळवल्या. रशिद खान (Rashid Khan) याने 28 धावात 1 विकेट मिळवली. त्यामुळे अखेरच्या क्षणी दिल्लीचा विजय सोपा झाला.

Tags:    

Similar News