बॉलर ने दिली ठसण, Shubhaman Gill ने सांगून ठोकला लांबलचक six

Shubhman Gill Century in IPL 2023 : आयपीएल 2023 च्या हंगामात गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल याने अवघ्या 56 चेंडुत तडाखेबाज शतक(century) झळकावलं. मात्र, ही कामगिरी करतांना शुभमन याला बॉलरनं ठसण दिली. त्यानंतर एरवी मैदानावर शांत राहणा-या शुभमन याने बॉलरला इशा-यानेच लांब सिक्सर मारणार असल्याचा प्रत्युत्तर दिलं आणि पुढच्याच बॉलवर शुभमन याने उत्तुंग सिक्सर मारून शतक झळकावलं.

Update: 2023-05-16 09:06 GMT

GT vs SRH : गुजरात टायटन्स(Gujarat Titans) ने सनराईजर्स हैदराबाद (sunrise Hyderabad) संघाला 34 धावांनी हरवून प्लेऑफ मध्ये आपली जागा पक्की करून ठेवलीय. गुजरातच्या या विजयाचा शिल्पकार ठरलाय तो शुभमन गिल. मॅच सुरू असतांना गुजरात टायटन्सच्या एकामागून एक विकेट्स पडत होत्या. मात्र, शुभमनने  एकबाजूने खिंड लढवली. मैदानाचे चारही बाजूला शुभमनने फटकेबाजी केली. त्याच्या या फलंदाजीने प्रेक्षकांना मंत्रमुक्त केलं. शतक झळकावल्यानंतर प्रतिक्रिया देतांना शुभमन याने ‘त्या’ उत्तुंग सिक्सरमागचं गुपित उघडं केलं. तो म्हणाला, “मी एका गोलंदाजास सांगितले होते की जर तू माझ्या विरुद्ध गोलंदाजी केली तर मी तुला सिक्स मारीन”. आणि शुभमननं ते प्रत्यक्षात करूनही दाखवलं.

कुणी दिली शुभमनला ठसण?(Who Sleged Shubhman Gill)

शुभमन गिल ला धमाकेदार शतकीय खेळीसाठी ‘मॅन ऑफ द’ मॅच’ चा पुरस्कार मिळाला. सामना झाल्यानंतर त्यानं खुलासा केला की,” सामना सुरू होण्याच्या अगोदरचं माझ आणि गोलंदाज अभिषेक शर्माच(abhishek sharma) बोलणं झालं होतं. तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की जर तू माझ्या विरोधात गोलंदाजी केलीस तर मी तुला सिक्स मारणार आणि शुभमन यानं बोलल्याप्रमाणे अभिषेक शर्मा याला उत्तुंग षटकार ठोकलाही. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल दोघे खूप चांगले मित्र(friend) आहेत. पंजाब(Panjab) मधील स्थानिक क्रिकेट संघातून ते सलामीवीर म्हणून खेळतात.

गिलचे विक्रमी शतक(century shubhman gill)

हैदराबादविरुद्ध शुभमन गिलने केवळ 58 चेंडूत 101 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 13 चौकार आणि केवळ एक षटकार आला. त्याने ही खेळी 174.14 च्या स्ट्राईक रेटने खेळली आहे. तर साई सुदर्शनने 36 चेंडूत 47 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय गुजरातच्या अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

Tags:    

Similar News