Rahmanullah Gurbaz : अफगाणिस्तानचा खेळाडू गुरबाजने वाटले गरजूंना पैसे

Anchor - अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमान उल्ला गुरबाज यांनी दिवाळीच्या प्रसंगी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीबांना मदत करताना दिसत आहे. रात्रीच्या अंधारात त्यांनी रस्त्याशेजारी राहणाऱ्या लोकांची भेट घेत दिवाळी निमित्त भेट दिली.

Update: 2023-11-13 12:47 GMT

विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकलेला नाही. मात्र, अनेक मोठ्या संघांना पराभूत करून त्यांनी क्रिकेटप्रेमींची मने ही जिंकली आहेत. विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्ताच्या एका खेळाडूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरलं झाला आहे. या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमान उल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz) यांनी दिवाळीच्या प्रसंगी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीबांना मदत (Help the poor) करताना दिसला आहे.

- A beautiful gesture by Gurbaz. pic.twitter.com/AHgC1Nd1Bo

गुरबाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याचे चाहते अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूचे कौतुक करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये गुरबाज रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरिबांजवळ पैसे ठेवताना दिसत आहे. गाढ झोपलेल्या गरीब लोकांच्या शेजारी पाचशेच्या नोटा ठेवल्या आहेत. जागे झालेल्या महिलेच्या हातात त्याने पैसे दिले आणि नंतर शांतपणे गाडीतून निघून गेला.

गुरबाजचे भारतातही खूप चाहते आहेत. अफगाणिस्तानचा सर्वात लोकप्रिय खेळाडू राशिद खान व्यतिरिक्त, रहमानउल्ला गुरबाज देखील दरवर्षी किमान दोन महिने तरी भारतात राहतो. तो आयपीएलमधील महत्त्वाचा खेळाडू असून गुजरात टायटन्ससाठीही तो क्रिकेट खेळला आहे.

Tags:    

Similar News