मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका जवळ येवू लागल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ज्यांनी फक्त पालिकेच्या सत्तेवर राजकारणाला सुरवात केली आणि फक्त राजकारण केले व मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली. आणि आपली घरं भरुन घेण्याचे काम केले. एका मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे पक्ष संघटना वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न पक्षप्रमुख करत आहे. हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी सांगितले आहे.
तर दुसरीकडे तेजस ठाकरेला सुध्दा वाटत असेल की, आपण आपल्या वडीलांचा वारसा घेवून राजकारणात काम करावे, मात्र तेजस ठाकरे यांनी वडिलांचा वारसा न चालवता आपल्या आजोबांचा वारसा चालवावा, असा सल्ला पावसरकर यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे घरातून बसून निवडणूका यंदा लढवता येणार असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांना पावसरकर यांनी लगावला. निवडणुकीसाठी लोकांमध्ये जावे लागते, लोकांचे प्रश्न समजुन घ्यावे लागतात. अशी टिका सुद्धा पावसकर यांनी ठाकरे यांच्यावर केली.