Fact Check: विनाअनुदानित शाळांचा ‘कायम’ शब्द कुणी काढला?
Max Maharashtra | 27 Aug 2019 8:34 PM IST
X
X
सोमवारी विनाअनुदानीत शाळांच्या शिक्षकांच्या मोर्चावर पोलीसांनी लाठी चार्ज केला. प्रशासनाच्या या कृत्याचा सर्वच स्थरांतुन निषेध केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर आज बिड मध्ये महाजनादेशयात्रे निमीत्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “गेल्या सरकारच्या काळामध्ये ‘कायम विनाअनुदानीत’ एफीडेवीट देवून आम्ही जन्मात कधिही अनुदान मागणार नाही. असं एफीडेव्हीट घेवुन या शाळा घेतल्या आणि या शिक्षकांची भरती केली. परंतु आमच्या सरकारकडे ते आले आणि म्हणाले त्या वेळेस आम्ही काही केलं असलं तरी देखील आता या शाळा चालवणं होत नाही. एवढे शिक्षक आहेत आम्हाला तुम्ही अनुदान द्या. ‘आम्ही कायम शब्दच काढला’ नाही तर 20 टक्के अनुदान देखील दिलं आणि त्यांना सांगितलं टप्प्या टप्प्याने आम्ही तुम्हाला अनुदान देवू.” असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं.
https://youtu.be/qCuDk43MNHQ
परंतु तात्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचं हे विधान खोटं असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्र्यांनी आज बीड येथे पत्रकार परिषदेत बोलताना कायम विनाअनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द आम्हीच वगळल्याचा दावा केल्याची माहिती पत्रकारांकडून कळाली आहे. पण ही वस्तुस्थिती नाही. मी मुख्यमंत्री असताना दि. २० जुलै २००९ रोजी हा निर्णय घेण्यात आला होता.” या ट्वीट सोबत त्यांनी शासन निर्णयाच्या कॉपी जोडल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आज बीड येथे पत्रकार परिषदेत बोलताना कायम विनाअनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द आम्हीच वगळल्याचा दावा केल्याची माहिती पत्रकारांकडून कळाली आहे. पण ही वस्तुस्थिती नाही. मी मुख्यमंत्री असताना दि. २० जुलै २००९ रोजी हा निर्णय घेण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी आज बीड येथे पत्रकार परिषदेत बोलताना कायम विनाअनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द आम्हीच वगळल्याचा दावा केल्याची माहिती पत्रकारांकडून कळाली आहे. पण ही वस्तुस्थिती नाही. मी मुख्यमंत्री असताना दि. २० जुलै २००९ रोजी हा निर्णय घेण्यात आला होता.
https://twitter.com/AshokChavanINC/status/1166293866359734273
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ‘कायम' या शब्दाबद्दल केलेलं विधान खोटं असल्याचं समोर आलं आहे.
Updated : 27 Aug 2019 8:34 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire