Home > News Update > हद्द झाली ! राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंचं कोरोना रुग्णांसोबत फोटोसेशन

हद्द झाली ! राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंचं कोरोना रुग्णांसोबत फोटोसेशन

नेत्यांनी विनामास्क फिरायचं, कोरोना वाढला म्हणून पुन्हा लॉकडाऊन लावायचं, लॉकडाऊन लागला की पोटाला चिमटा जनतेच्या... कायदा मोडणाऱ्यांवर आमदार खासदारांवर शासन काय कारवाई करणार?

हद्द झाली ! राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंचं कोरोना रुग्णांसोबत फोटोसेशन
X

अहमदनगर: अलिकडे नेत्यांना आपण कसे डॅशिंग आहोत, हे दाखवायची सवय लागली आहे. त्यासाठी ते सतत नवनवीन क्लृप्त्या लढवत असतात. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आपल्या कामामुळे नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतात. पहिल्या लाटेच्या या काळात ते स्वत: पाठीवर पंप घेऊन फवारणी करताना दिसले होते. यावेळी त्यांचं कौतुकही झालं. मात्र, दुसऱ्या लाटेत हे महोदय थेट कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये पोहोचले. आता तुम्ही म्हणाल ते कोरोना पॉझिटीव्ह असतील. नाही… ते कोरोना पॉझिटीव्ह नाहीत. ते आपण गावात फेरफटका मारतो तसे… कोरोना वॉर्डमध्ये जाऊन फेरफटका मारत असल्याचं फोटोवरून दिसतं.

चेहऱ्यावर मास्क, रुमाल काहीच नाही. अशा अवस्थेत आमदार महोदय रुग्णांसोबत 'चलो सेल्फी हो जाये' मूडमध्ये फोटो काढत आहेत. इकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलिस कायद्याचा बडगा उगारत आहे. राज्यातील कोरोना आटोक्यात यावा म्हणून सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावलं आहे. या शहरातील लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.



अशा परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी मास्क प्रभावी साधन आहे. मात्र, अलिकडे कोरोनाचं लोकप्रतिनिधींनांच काहीही वाटत नाही. ते विना मास्क फिरताना दिसतात. अनेक लोकप्रतिनिधींनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोना बरा होतो. अशी एक भावना देखील आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या भावनेमुळेच अनेक लोक मास्क घालताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचे आकडे वाढत आहेत. आणि या वाढत्या आकड्यांमुळेच राज्यात विविध ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.



कोरोनातून माणूस बरा होतो. जनमाणसात निर्माण झालेली ही भावना चांगली असली तरी त्यामुळंच लोक बेफिकीरपणे वागताना दिसतात. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात तर लोक लोकप्रतिनिधींचं अनुकरण करताना पाहायला मिळतात. मात्र, लोकप्रतिनिधी बेफिकीरपणे वागतात, लोक त्याचं अनुकरण करतात. आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो. लॉकडाऊनमुळं अनेकांची पोट सध्या लॉक झाली आहेत.

राज्यात संख्या वाढत असल्याने खबरदारी घेऊन, शासन नियम पाळण्याचे आवाहन राज्यातील जनतेला करत आहे. यासाठी शासन कोट्यांवधी रुपये खर्च करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात वारंवार आवाहन करत आहेत. मात्र, काही चमकोगिरी करणारे नेते अजूनही याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वारंवार ट्विट करत कोव्हीड संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन जनतेला करत असतात.

Updated : 28 March 2021 8:08 AM IST
Next Story
Share it
Top