#Fact_Check | अयोध्या निकालामुळे नागरिकांच्या सोशल मीडियावर पाळत ठेवली जात आहे का?
X
अयोध्या प्रकरणावर येत्या काही दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवांचे पेव पसरले आहे. दोन दिवसांपासून व्हॉट्सअप आणि फेसबुकवर एक मेसेज व्हायरल आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये हा मेसेज आहे. कदाचित तुम्हालाही एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा मेजेल आलेला असू शकतो. यामध्ये सोशल मीडियासाठी नवी नियमावली लागू केल्याचं सांगतिलं जात आहे.
या मेसेजमध्ये म्हटलंय की, भारतीय नागरिकांचे सर्व फोनकॉल रेकॉर्ड केले जातील, सर्व कॉल रेकॉर्डिंग सेव्ह होतील आणि ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप प्रमाणेच नजर ठेवली जाईल आणि सर्व डिव्हाईस म्हणजे मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर हे मंत्रालयाच्या यंत्रणेशी जोडले जातील.
यासोबत सरकार किंवा पंतप्रधान यांच्यावर टीका करणार्या पोस्ट किंवा व्हिडीओज पुढे पाठवू नयेत असा इशाराही देण्यात आला आहे. राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाचे आक्षेपार्ह संदेश लिहणे किंवा पाठवणे हा गुन्हा ठरू शकतो आणि त्यासाठी वॉरंटशिवाय अटकही होऊ शकते असंही या मेसेजमध्ये सांगण्यात येतंय.
काय आहे मेसेज?
अयोध्या फैसला कल से नये Communication के नये नियम लागू होने वाले हैं :-
1. सभी कॉल की Recording होगी।
2. सभी Call Recording Saved होंगे
3. Whatsapp, Facebook, Twitter और सभी Social Media सभी Monitored होंगे
4. जो ये नहीं जानते उन सभी को सूचित कर दीजिये।
5. आपकी Devices को मन्त्रालय Systems से जोड़ दिया जायेगा।
6. ध्यान दीजिये कोई भी गलत Message किसी को भी मत भेजिये
7. अपने बच्चों, भाइयों, रिश्तेदारों, दोस्तों,परिचितों आदि सभी को सूचित कर दें कि इन सबका ध्यान रखें और Social Sites को संयम से चलायें।
8. कोई आपत्तिजनक Post या Video..आदि जो आप Recieve करते हैं राजनीति या वर्तमान स्थिति पर सरकार या प्रधानमंत्री के खिलाफ, उसे Send नहीं करें।
9. इस समय किसी राजनीतिक या धार्मिक मुद्दे पर कोई आपत्तिजनक मैसेज लिखना या भेजना अपराध है.....ऐसा करने पर बिना वारंट के गिरफ़्तारी हो सकती है |
10. पुलिस एक नोटिफ़िकेशन निकालेगी....फ़िर Cyber अपराध...फ़िर Action लिया जायेगा ।
11. यह बहुत ही गम्भीर है।
आप सभी Group Members, Admins,...इस विषय पर गहराई से सोचिये
12. कोई गलत Message मत भेजिये। सभी को सूचित करें तथा इस विषय पर ध्यान रखें।
13. Please इसे Share कीजिये...
Groups ज्यादा सतर्क व सावधान रहें।
हे आहे सत्य
उत्तर प्रदेश पोलिसांनी हा व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयोध्या प्रकरणाचा निकाल हा संवेदनशील असल्याकारणाने त्याबद्दल खबरदारीचे उपाय केले जात आहेत हे सत्य आहे. मात्र, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल किंवा त्यांच्या गोपनियतेचा भंग होईल असं कोणतंच पाऊल सरकारकडून उचलण्यात आलेलं नाही.
खबरदारीचा उपाय केंद्र सरकारच्या आदेशानंतर व्हॉट्सअपने २० लाख ग्रुप्स आणि अकाऊंट बंद केले आहेत. याशिवाय फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, सिग्नल या अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवणाऱ्या अकाऊंट्सवर नजर ठेवली जात आहे. मात्र, या संपूर्ण कारवाईचा सर्वसामान्य नागरिकांना कोणताच त्रास होणार नाही.
‘मॅक्स महाराष्ट्र’ही आपल्या वाचकांना प्रेक्षकांना अवाहन करत आहे की, अशाप्रकारे कोणत्याही मेसेजची विश्वासार्हता तपासल्याशिवाय त्यांना फॉरवर्ड करुन नये आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करु नये. देशात आणि राज्यात शांतता प्रस्थापित रहाणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
सोशल मीडियावर काही शंकास्पद मजकूर आढळल्यास आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवावा. आम्ही त्याची पडताळणी करुन त्याचं वास्तव आपल्यापर्यंत पोहचवू.