Home > Fact Check > Fact Check | रवीश कुमार की शकीला बेगम?

Fact Check | रवीश कुमार की शकीला बेगम?

Fact Check | रवीश कुमार की शकीला बेगम?
X

नागरिकता संशोधन कायद्याविरूद्ध दिल्लीच्या शाहीनबागमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत आहेत. आंदोलनाच्या निमित्ताने देशातील प्रसारमाध्यमांवरही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. चुकीची माहिती दिल्याबद्दल आणि चुकीचं वार्तांकन केल्याबद्दल दोन्ही बाजूच्या मंडळींनी पत्रकारांवर आरोप केले आहेत.

एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते रवीश कुमार यांच्याविषयी एक अफवा काही दिवसांपासून सोशल मीडियावर उडाली आहे.

शाहीनबागमधील आंदोलनातला एक फोटो व्हायरल केला जात आहे. त्यात हिजाब घातलेली एक महिला दिसत आहे. ही महिला म्हणजेच रवीश कुमार आहेत असा दावा करण्यात येतोय. आंदोलनाला समर्थन देण्यासाठी रवीश कुमार महिलेच्या वेशात शाहीनबागमध्ये गेल्याचं सांगण्यात येतंय.

फेसबुक आणि ट्विटरवर या आशयाचे अनेक मेसेज व्हायरल आहेत. कधी प्रश्नार्थक, तर कधी दाव्यासह हा फोटो व्हायरल करण्यात येतोय.

तथ्य पडताळणी –

या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर स्वतः रवीश कुमार यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्यांनी त्या फोटोमध्ये आपण नसून शकीला बेगम नावाच्या महिला असल्याचं सांगितलं आहे. शकीला या शाहीनबाग परिसरातच रहतात. मुन्ने भारती यांनी या महिलेला शोधून काढल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

शकीला बेगमसोबत मुन्नै भारती

रवीश कुमारविषयी अफवा पसरवणं हे आयटी सेलच्या कामांपैकी हे एक प्रमुख काम आहे. मला फसवण्यासाठी आयटीसेल फार मेहनत करते. मला बदनाम करण्यासाठी मिळतेजुळते चेहरे शोधून अशाप्रकारच्या पोस्ट केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. मानसिकरित्या गुलाम झालेली मंडळी हे फोटो पोस्ट करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

रवीश कुमार यांची फेसबुक पोस्ट

निष्कर्ष -

रवीश कुमार वेषांतर करून शाहीनबागच्या आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट पूर्णतः तथ्यहीन आहेत.

Updated : 20 Feb 2020 2:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top