Home > News Update > नांदेड : हल्लाबोल कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या फोडल्या

नांदेड : हल्लाबोल कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या फोडल्या

नांदेड : हल्लाबोल कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या फोडल्या
X

नांदेड येथे होळीच्या दिवशी शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्यात आला असल्याने, या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती.





मात्र प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत हल्लाबोल मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून चक्क पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात चार पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस अधीक्षक यांच्या वाहनांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहेत.घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून,नांदेड शहरात तणावाचे वातावरण बनले आहे.तर याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Updated : 29 March 2021 9:35 PM IST
Next Story
Share it
Top