Home > News Update > पश्चिम बंगालमध्ये 'मतुआ समाज' ठरवणार सत्तेचे गणित

पश्चिम बंगालमध्ये 'मतुआ समाज' ठरवणार सत्तेचे गणित

पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाज ठरवणार सत्तेचे गणित
X

पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीचा निकाल आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ज्यात पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा ,आसाम 126,तामिळनाडू 234,केरळ 140 आणि पुद्दुचेरी 30 जागांसाठी ह्या निवडणुका झाल्या होत्या.

मात्र संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये काय निकाल येतो. कारण तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली होती. पण पश्चिम बंगालमध्ये 'मतुआ समाजा'ची मतं ज्याच्या पारड्यात पडली सत्तेची चावी त्याच्याकडे असते असं बोललं जातं.

निवडणूक दरम्यान सुद्धा पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची खूप चर्चा झाली होती. राज्यात 3 कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या समाजाचे अंदाजे 1 कोटी 80 लाख मतदार आहे.

पश्चिम बंगालच्या 294 विधानसभा जागांवरील जवळपास 40 जागांवर मतुआ समाजाचा प्रभाव पाहायला मिळतो. यात उत्तर 24 परगना, नदिया आणि दक्षिण 24 परगनाचा समावेश आहेत. याव्यतिरिक्त 20 अशा जागा आहे जिथे मतुआ समाजाचा अप्रत्यक्षरित्या प्रभाव पाहायला मिळतो.

त्यामुळे तृणमूल आणि भाजप या दोन्ही पक्षाने ह्या समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी खूप प्रयत्न केले. तसेच हा समाजच सत्तेची चावी असल्याचं पश्चिम बंगामधील एक्स्पर्ट सांगतात

उत्तर 24 परगना येथील ठाकुर नगर मतुआ समाजाचा गड समजला जातो. मात्र खरी परिस्थिती निकालानंतरच स्पष्ट होईल

Updated : 2 May 2021 8:01 AM IST
Next Story
Share it
Top