Fact Check : राणा अय्युबच्या नावानं व्हायरल होत असलेलं 'हे' ट्विट खरं आहे का?
Max Maharashtra | 10 Jun 2019 11:05 PM IST
X
X
"अल्पवयीन बलात्कारी काय माणसं नाहीत का? त्यांना मानवअधिकार नाहीत, हे हिंदुत्व विचारसरणीचे सरकार या अध्यादेशाचा वापर करुन अल्पवयीन बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याचे कारण पुढं करुन जास्तीत जास्त मुस्लीम लोकांना फासावर लटकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारतात मुस्लीम सुरक्षित नाहीत."
या आशयाचं ट्विट पत्रकार राणा अय्युब यांच्या नावानं रिपब्लिक टीव्ही या अकाउंटवरुन ट्विट करण्यात आलं होतं. मात्र, काही काळानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं.
दरम्यान हेच ट्विट चित्रपट क्षेत्राशी संबंधीत असणाऱ्या अशोक पंडीत यांनी शेअर केलं होत. त्यांनी देखील काही काळानंतर डिलीट केलं आहे.
दरम्यान हे ट्विट २०१८ पासून सोशल मीडियावर व्हायरल झालं असून हजारो लोकांनी शेअर केलं आहे. योगी आदित्यनाथ की सेना (@YogiGKP) या ४ लाख २५ हजार फॉलोअर असणाऱ्या या पेजने देखील ही पोस्ट पोस्ट केली होती. तसंच हीच पोस्ट 'वी सपोर्ट रिपब्लिक’ 'WE SUPPORT REPUBLIC’ या पब्लिक ग्रृपवर देखील ही पोस्ट पोस्ट करण्यात आली आहे.
हे ट्विट रिपब्लिक टिव्ही नावाच्या एका अकाउंट वरुन ट्वीट केले असून सदर अकाउंट रिपब्लिक टीव्हीचे अधिकृत अकाउंट नाही. @Republic हे रिपब्लिक टिव्हीचे अधिकृत अकाउंट आहे. या संदर्भात राणा अ्य्युब यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरुन स्पष्टीकरण दिलं असून आपण अशा कोणत्याही प्रकारचं स्टेटमेन्ट केलं नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, या स्पष्टीकरणापुर्वीच हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.
Updated : 10 Jun 2019 11:05 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire