Home > मॅक्स किसान > जनता भाजपचा अहंकार मोडून काढेल, RJD तुमच्या बरोबर; तेजस्वी यादवांचा हेमंत सोरेन यांना पाठिंबा

जनता भाजपचा अहंकार मोडून काढेल, RJD तुमच्या बरोबर; तेजस्वी यादवांचा हेमंत सोरेन यांना पाठिंबा

जनता भाजपचा अहंकार मोडून काढेल, RJD तुमच्या बरोबर; तेजस्वी यादवांचा हेमंत सोरेन यांना पाठिंबा
X

ईडीने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या सात तासांपासून हेमंत सोरेन यांची कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु होती. याचौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोरेन सरकारमधील परिवहन मंत्री चंपई सोरेन यांच्याकडे आता सत्ता सोपवली जाणार असल्याचेही माहिती समोर येत आहे. दरम्यान, देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. अशातच ही घटना राजकीय भूकंप असल्याचे म्हटले जात आहे.




यातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तसेच बिहार राज्याचे पूर्व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहार चंदिगड आणि आत्ता झारखंड, भाजपने एकाच आठवड्यात लोकशाही आणि संघराज्य नष्ट केले आहे, आता जनताच यांचा अहंकार मोडून काढेल असे म्हटले आहे.

तेजस्वी यादव यांनी ट्विट करत राजद ( राष्ट्रीय जनता दल ) आपल्या बरोबर उभी आहे असं म्हणत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पाठिंबा दर्शवला आहे.

झारखंड 1 फेब्रुवारीला बंद राहणार असल्याची घोषणा आदिवासी संघटनांनी केली आहे




हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ 1 फेब्रुवारी रोजी झारखंड बंदची घोषणा करण्यात आली आहे. सर्व आदिवासी आदिवासी संघटनांच्या बॅनरखाली ही घोषणा करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 8 तासांच्या चौकशीनंतर 31 जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ईडीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. याच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी १ फेब्रुवारी रोजी झारखंड बंदची घोषणा केली आहे.




Updated : 1 Feb 2024 7:46 AM IST
Next Story
Share it
Top