Home > मॅक्स किसान > `फाली` शेतीत भविष्यातील 25 लाख नायक तयार करणार

`फाली` शेतीत भविष्यातील 25 लाख नायक तयार करणार

`फाली` शेतीत भविष्यातील 25 लाख नायक तयार करणार
X

शेतीकडे नवीन पिढी वळत नाहीय त्यामुळे गावाकडून शहराकडे स्थलांतर वाढत आहे. देशाचे भविष्य असलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांमध्ये मॉडर्न एग्रीकल्चर संस्कृती रूजावी, जेणे करून शेतीत अत्याधुनिक साधनांचा वापर करून आर्थिक सुबत्ता येईल. यासाठी जळगाव येथ जैन इरिगेशन मार्फ़त FALI (फ्युचर अॅग्रिकल्चर लिडर्स ऑफ इंडिया ) आधुनिक शेतीतील नवं तंत्रज्ञान,नावीण्यपूर्ण शेती उपकरणे आणि बिझनेस 200 मॉडेल प्रदर्शनात विद्यार्थांनी मांडले.

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील एक हजारांवर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून भविष्यात देशभरातील इतर राज्याचे विद्यार्थीही यात सहभाग होणार आहेत. शालेय जीवनापासूनच शेतीची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांच्या मनातील आयडियांना चालना द्यावी , शालेय जीवनापासूनच शेतीची आवड निर्माण होऊन त्यातून भारतात भविष्यातील कृषी नायक तयार व्हावे हाच उद्देश 'फाली' चा आहे .

फालीमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, इंटरशिप आणि व्यवसायासाठी आवश्यक ते प्रोत्साहन दिले जाणार आहे. भविष्यात फालीमधील विद्यार्थी एग्रीकल्चरचे नवे मॉडेल साठी आर्थिक मदतही दिली जाणार आहे. फाली च्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शेती पूरक अवजारे तसेच नव तंत्राद्वारे शेती कशी करता येईल ह्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

सध्या विद्यार्थी आयटी इंजिनियर , डॉक्टर , ह्या क्षेत्रात करियर करण्याकडे मोठया संख्येने जात आहे , मात्र कृषी प्रधान देशात शेती क्षेत्राकडे तरुण वळत नाही , हीच परिस्थिती राहिली तर भविष्यात शेतीची मोठी समस्या भारतात उभी राहु शकते. ह्यामुळेच 'फाली' च्या माध्यमातून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी , शेती आणि त्यातून उद्योग हे मोठं करियर संधी आहेत हे लहान वयातच मुलांमध्ये रुजवण्यासाठी व भविष्यातील कृषी क्षेत्रातील नायक तयार करण्यासाठी फालीची स्थापना झाली असल्याचा उद्देश जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितलं.

FALIच्या संचालिका नॅन्सी बेरी, यांनी सांगितलं की पायलट प्रोजेक्ट्स म्हणून आम्ही गेले आठ वर्षे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील विद्यार्थी सहभागी होत होते मात्र ह्याची भविष्यातील आवश्यकता लक्षात घेता देशभरातील विद्यार्थी यात पुढील काळापासून सहभागी होतील भारतातून 25 लाख विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रांत नायक बनवायचे असल्याचं बेरी यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांनी आपले शेतीचे प्रकल्प सादर केले, भविष्यात आपल्याला शेती आणि शेती उद्योग ह्यावरच आपण करियर करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितलं. फालीचे विद्यार्थ्यांचे सादरकीरण प्रभावशाली आहे असे बुर्जीस गोदरेज म्हणाले.

आधुनिक शेती शाश्वत बनवण्यासाठी तुम्ही फालीचे विद्यार्थी उत्साही आणि जिद्दी आहेत. जगातील सर्व लोकांसाठी अन्नधान्य पिकवणे हे आवश्यक आहे. भारतीय कृषीक्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे असे फालीच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहिल्यानंतर वाटते यातुन उद्योजकाची वाट धरली जाते. आधुनिक शेती करण्यासाठी प्रेरणा मिळते. नवीन व्यवसाय करा किंवा जे काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या असा सल्ला गोदरेज यांनी दिला.

Updated : 7 Jun 2022 8:39 PM IST
Next Story
Share it
Top