Home > Fact Check > Fact Check : हिंदू-मुस्लिम ताणतणावासंदर्भातील ‘तो’ संदेश खरा आहे का?

Fact Check : हिंदू-मुस्लिम ताणतणावासंदर्भातील ‘तो’ संदेश खरा आहे का?

Fact Check : हिंदू-मुस्लिम ताणतणावासंदर्भातील ‘तो’ संदेश खरा आहे का?
X

"कोई भी हिन्दू वेस्टर्न हाईवे पर गोड़बंदर के होटल फाउंटेन में खाना नास्ता करने ना जावे यह होटल एक ऐसे मुस्लिम की हे जो हिन्दुओं के दम पर इतना बड़ा और पैसे वाला बना वो हिन्दुओं से सख्त नफरत करता है ओर कोई भी छोटी मोटी बात होने पर भी अपने यहां पाले हुए मुस्लिम गुंडों को तलवारों हाकी स्टिको सरियो के साथ हिन्दुओं पर अटैक करने को छोड़ देता है इस लिए सभी हिन्दुओं को निवेदन है कि इस कटुए को इसकी ओकत दिखानी है आप असली ओर सच्छे हिन्दू हो ओर इन कटुओं से नहीं डरते हो तो इस एसएमएस को इतना फैलाओ की होटल फाउंटेन बन्द हो जाए ओर इन जैसे लोगो को जो हिन्दुओं को कुछ नहीं समजते उनको अपनी ताकत दिखाओ जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र जय शिवाजी"

हा मेसेज whatsapp वर वेगाने पसरवला जातोय. सोबत एक व्हिडियो सुध्दा आहे. व्हिडीयोत दोन गटात मारामारी सुरू आहे. यामध्ये काही युवक दिसताहेत.‌ काही महिलासुध्दा आहेत. त्यांच्या भाषेवरून कळतंय की ते मराठी आहेत. समोरचे लोक पेहरावावरून मुस्लिम दिसताहेत. प्रथमदर्शनी ही हिंदू-मुस्लिम ताणतणावाची घटना आहे, असं भासतं. व्हिडीयो सोबत फिरणाऱ्या मेसेजची भाषा चिथावणीखोर आहे.

व्हिडीयो मीरा रोड येथील फाऊंटन हाॅटेलचा आहे. जमावातील काही महिला गाऊनवर आहेत. काही युवकही घरगुती पेहरावात आहेत. त्यामुळे लोक तिथे जेवायला आलेत आणि नंतर काहीतरी वाद झालाय, असं प्रथमदर्शनी दिसत नाही. आधी काहीतरी वादविवाद झालाय व नंतर समर्थनार्थ लोक जमा झालेत, असं लक्षात येतं.

या व्हायरल होणाऱ्या संदेसाबाबत काशिमिरा पोलिस ठाण्यातून माहिती घेतली असता, व्हिडियोत जरी हिंदू-मुस्लिम दिसत असले तरी प्रत्यक्षातला मामला हिंदू-मुस्लिम धार्मिक ताणतणावाचा नाही. घटनेला तसा रंग दिला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सव्वा बाराच्या सुमारास दोन युवक हॉटेल फाऊंटनवर पान खाण्यासाठी (कारण निश्चित नाही) गेले होते. (लोकमतच्या बातमीत पान खाण्यासाठी गेले होते असं म्हटलंय, तर इंडियन एक्स्प्रेस च्या बातमीत जेवणासाठी आले होते, असा उल्लेख आहे.) त्यांचा हाॅटेलच्या प्रांगणात बाईक पार्क करण्यावरून तिथल्या सुरक्षारक्षकांशी वाद झाला. हा वादही नवा नाही.

यापूर्वीही स्थानिक युवकांसोबत हाॅटेलवाल्याची वादावादी झालेली आहे. बाचाबाची मारामारीपर्यत गेल्यावर युवकांच्या समर्थनार्थ आणखी जमाव आला. हाॅटेलवर तोडफोड झाली.‌ हाॅटेल कर्मचाऱ्यांकडूनही प्रत्यत्तर दिले गेले व दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही पोचले.

या दंगलीत दोन्ही बाजूचे लोक व एक पोलिस अधिकारी जखमी आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकमेकांविरोधात फिर्याद नोंदवली आहे. जखमी पोलिस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरूनही गुन्हा दाखल असून दोन्ही बाजूंच्या ४४ जणांना पोलिसांनी अटक केलीय. सध्या हाॅटेलवर मोठा बंदोबस्त असून सदर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

थोडक्यात, Whatsapp वर पसरवण्यात येणारा वरील संदेश खोडसाळ, चिथावणीखोर आणि मूळ घटनेचा विपर्यास करणारा असून मूळ घटना धार्मिक ताणतणावाची नाही.‌ वैयक्तिक कारणावरून वाढलेल्या वादाने दंगलीचे स्वरूप घेतले आहे.

Updated : 9 Oct 2019 4:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top