Fact Check : पॉर्न स्टारचा फोटो का ट्वीट केला पाकच्या माजी उच्चायुक्तांनी
Max Maharashtra | 3 Sept 2019 8:30 PM IST
X
X
भारताने जम्मु काश्मिरचे कलम ३७० आणि ३५अ हे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्ताचे नेते रेहमान मलिक यांनी जम्मू काश्मिर वर ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी कॉंग्रेस नेता गुलाम नबी आझाद यांच्या भाषणाचे समर्थन करत म्हटले होते, हा तुमच्याच देशातील नेता आहे, जो काश्मिरवर होणाऱ्या अत्याचांबद्दल बोलत आहे. असे म्हणून त्यांनी यूनायटेड स्टेट (UNS) ला टॅग करण्याएवजी यूएनओ UNOGAME ला टॅग केले. ही प्रकरण ताजे असतानाच पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरमधील जखमी तरुण म्हणून चक्क एका पॉर्नस्टारचा फोटो ट्विट केला आहे.
जम्मू, काश्मिर येथील अनंतनागमध्ये दगडफेक झाली होती या दगडफेकीत पॅलेट गनमुळे युसूफ नावाच्या एका तरुणाचा डोळा फुटला होता. ‘या विरोधात आवाज उठवायला हवा’, अशा कॅप्शनसहीत जॉनी सीन नावाच्या पॉर्नस्टार्सचा एका महिलेसोबतचा फोटो अब्दुल बासित यांनी रिट्विट केला. त्यानंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर बासित यांनी हे ट्विट डिलीट केले असले, तरी अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉर्ट्स आता व्हायरल केले आहेत. भारतावर टीका करण्याच्या नादात पाकिस्तानी नेत्याने आणि अधिकाऱ्याने स्वत:चे हसू करून घेण्याची ही मागील दिवसांपासून ही दुसरी घटना आहे.
यावरून त्यांनी केलेले ट्वीट हे जम्मू काश्मिर मधील जखमी तरूणाचे नसून, पॉर्न स्टारचे असल्याचे उघडकीस आले आहे.
Updated : 3 Sept 2019 8:30 PM IST
Tags: fact check johnny sins marathi news pakistan porn sex VIDEO
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire