Home > Fact Check > Fact Check : 'त्या' शीख व्यक्तीला खरंच मुस्लिम युवकांनी झोडपलंय?

Fact Check : 'त्या' शीख व्यक्तीला खरंच मुस्लिम युवकांनी झोडपलंय?

Fact Check : त्या शीख व्यक्तीला खरंच मुस्लिम युवकांनी झोडपलंय?
X

एका शीख वयोवृध्द व्यक्तिला एक गुंड जमाव लाथाबुक्क्यांनी मारहाण करताहेत, असा विडियो नव्याने पसरू लागलाय. हा वृध्द "भारत माता की जय" म्हणतोय, म्हणून त्याला मुस्लिम युवक मारताहेत, असं विडियो सोबत पसरवण्यात येतंय.

पण हा मूळ विडियो जर पाहिलात, तर तो शीख व्यक्ति भाजपावाले चोर है म्हणत, मोदी सरकारला शिव्या देताना ऐकायला मिळतो. तो मैं भी चौकिदार हुं, असंही म्हणतो आणि भारतमाता की जय सुध्दा म्हणतो. हा विडियो कालपरवाचा दंगलीतला विडियो म्हणून मुस्लिमांना खलनायक बनवून पसरवला जात आहे. घटना बिहारमधील गयेमध्ये घडलेली असून वृध्दाने भारत माता की जय म्हटल्याबद्दल त्याला मुस्लिम युवक निर्दयपणे मारहाण करीत आहेत, असं विडियोसोबत पसरवलं जात आहे.

हे ही वाचा...

Jharkhand election result: : एका वर्षात भाजपच्या हातून ५ राज्य गेली?

जागतिक अर्थव्यवस्था एक ‘दुधारी’ तलवार!

सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली, अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ ट्विटला शिवसेनेचं उत्तर

पण हाच विडियो १९ आॅक्टोबरला पोस्ट झाल्याचं ट्वीटर, युट्युबवर पाहायला मिळतं. त्यामुळे विडियो कालपरवाच्या दंगलीतला असल्याची माहिती प्रथमत: खोटी ठरते. विडियो बाबत ट्वीटर, युट्युब, गुगल अशा विविध ठिकाणी शोध घेतला असता, विडियो तील व्यक्ति होतचंद नामक असून सिंधी असल्याचं कळतंय.

या व्यक्तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मारहाणीचा विडियो राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यातील आझाद चौक बाजारातील आहे. मारहाण करणारे स्थानिक दुकानदार आहेत. आरोपींत हिंदू आणि मुस्लिम दोन्हींचा समावेश आहे. होतचंदची रोजची शिवीगाळ, बडबडीवरून दुकानदारांकडून मारहाण झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यात कुठलाही जातीय धार्मिक रंग नसल्याचा खुलासा पोलिसांनी केलाय. पण दोन महिन्यांपूर्वीचा हा विडियो सद्य परिस्थितीत खोडसाळपणे मुस्लिमांविरोधात वापरला जातोय. जो दावा बनावट आहे.

Updated : 23 Dec 2019 1:08 PM IST
Next Story
Share it
Top