अनिल परबांनी ED(ईडी) वारी टाळली : दिले `हे` कारण....
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केंद्रीय तपास संस्थांनी एकापाठोठ एक भुंकप केले आहे. महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते शिवसेनेचे मंत्री अनिल परब( anil parab) यांनी ईडी (ED)ने नोटीस धाडून चौकशीसाठी बोलावले होते. ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनिल परब यांनी ईडीकडे १४ दिवसांचा वेळ मागितला असून मंत्रीपदाची जबाबदारी असल्यानं काही ठरलेली कामं आहेत, त्यामुळं हजर राहू शकत नाही, असं अनिल परब यांनी ईडी कार्यालयात कळवलं आहे.;
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेतील अटकेनंतर अनिल परब यांच्यावर कारवाई होणार असं सांगितलं जात होतं. कालच अनिल परब यांनी ईडीची नोटीस मिळाल्याचे सांगत नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या होत्या. महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यांमधे काल दिवसभर या चौकशीवरुन आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर परब चौकशीला सामोरे जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil parab)यांच्यावरील १०० कोटी रुपयांची खंडणी आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (parambir sinh) यांनी केल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या आरोपांच्या आधारे कोर्टबाजी आणि सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासानुसार 'ईडी'नेदेखील मनी लॉन्डरिंग कायद्यानुसार तपास सुरू आहे. या तपासात देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना 'ईडी'च्या अटकेत आहेत. अन्य काही जणांची चौकशी सुरु आहे.
काल शिवसेना खासदार भावना गवळींच्या संस्थासोबत अनिल परब यांना चौकशीसाठी 'ईडी'ने समन्स बजावला आहे. अनिल परब यांनी ईडीकडे आणखी १४ दिवसांचा वेळ वाढवून मागितला आहे. भाजपनेते किरीट सोमय्यांनी (Kirit Sommaiyya) महाविकास आघाडीच्या ११ नेत्यांची यादी जाहीर केली असून ईडीची पीडा आणखी किती जणांना छळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.