Fact Check : बांग्लादेशी टका आणि पाकिस्तानी रूपयाने भारतीय रूपयाला मागे टाकलं?

Update: 2019-08-29 07:30 GMT

गेल्या ७२ वर्षांत झालं नाही ते मोदी सरकार मध्ये झालं. बांग्लादेशी टका ही रूपयाला मागे टाकत, रूपया पेक्षा जास्त मजबूत झाला आहे. पाकिस्तानचं चलन ही भारतापेक्षा जास्त मजबूत झालं आहे, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टची सत्यता पडताळून पाहू. सध्या बांग्लादेशी टका भारतीय रूपया पेक्षा खालीच आहे, सध्या बांगलादेशी टका रूपयाच्या तुलनेत कमजोर आहे. बांग्लादेशी टका त्यांच्या तुलनेत मजबूत आहे मात्र भारताच्या तुलनेत अजूनही कमजोर आहे. थोडक्यात एक रूपया विकत घ्यायला बांग्लादेशी टका चे १ रूपया १७ पैसे खर्च करावे लागतात.

रुपयाच्या तुलनेत बांग्लादेशी टका

बांग्लादेशी टका गेल्या पाच वर्षांत बऱ्याच चढउतारानंतर रूपयाच्या तुलनेत थोडा मजबूत होताना दिसत आहे. बांग्लादेशातील कपडा उद्योग निर्यातीवर अवलंबून असल्याने त्यांचं डॉलर मध्ये येणारं उत्पन्न वाढल्याने टका मजबूत होताना दिसत आहे.

रूपयाच्या तुतनेत टका गेल्या पाच वर्षांत कसा होता

आता पाकिस्तानी रूपयाची स्थिती पाहूया.

पाकिस्तानी रूपया प्रचंड कमजोर आहे. भारताचा एक रूपया विकत घ्यायला २ रूपये २ पैसे खर्च करावे लागतात. गेल्या एक महिन्यात पाकिस्तानी रूपया भारताच्या रूपयाच्या तुलनेत थोडा वधारताना दिसत असला तरी ती वाढ फारशी चिंताजनक नाही.

भारतीय रुपयाच्या तुलनेत पाकिस्तानी रूपया

गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानी रूपया प्रचंड कमजोर झाला आहे. जवळपास १.५० पैसे ते २.२ पैसे असा प्रवास पाकिस्तानी रूपयाचा राहिला आहे. म्हणजे जर पूर्वी १ भारतीय रूपया विकत घेण्यासाठी १.५० पैसे लागत होते तर आज ते २.२२ पैसे लागतात.

गेल्या पाच वर्षात भारतीय विरूद्ध पाकिस्तानी रूपया

आता पाकिस्तानी रूपया आणि बांग्लादेशी टका यांची तुलना पाहूया. आजच्या दराप्रमाणे जर बांग्लादेशला पाकिस्तानचा एक रूपया विकत घ्यायचा असेल तर बांग्लादेशला केवळ ५३पैसे खर्च करावे लागतील. याचा अर्थ पाकिस्तानच्या रूपयाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

पाकिस्तानी रूपयाच्या तुलनेच बांग्लादेशी टका

 

सोशल मिडीयावर व्हायरल असलेल्या भारतीय रूपया बांग्लादेशी टका आणि पाकिस्तानी रूपयापेक्षा कमजोर झाल्याच्या पोस्ट खोट्या आहेत.

https://youtu.be/kmzR5uxxlfo

 

Similar News