मशिदीची तोडफोड करत असलेला एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल आहे. दिल्लीत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान मशिदीची तोडफोड करण्यात आली आणि नंतर त्यावर भगवा झेंडा लावला जात आहे, असा हा व्हिडीओ आहे. ही मशिद दिल्लीतील अशोक नगर भागातली असल्याचा दावा करण्यात येतोय. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपसह सर्वच समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ पसरवला जात आहे.
Mob damaging loud speakers of a Masjid and putting saffron & India flag on tye Minaret #Delhi
Genocide taking place in Delhi.#DelhiBurning #DelhiViolence #DelhiRiots@kashiflion @imMAK02 @OvaisSultanKhan @ReallySwara @pepper_smoker @RanaAyyub @iamrana @anuragkashyap72 pic.twitter.com/AHMr1sanc0
— | يونس ❄ (@yunusM) February 25, 2020
व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर त्याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली. ही मशिद दिल्लीतील नसून बिहारमधील असल्याचं सांगण्यात आलं.
याबाबत ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दि. २५ रोजी रात्री ९.४६ मिनीटांनी ट्विट केलं. दिल्लीतील अशोक विहार परिसरातील मशिदीच्या नुकसानीसंदर्भात काही चुकीची माहिती/बातमी फिरत आहे. अशोक विहारच्या परिसरात अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असं दिल्लीच्या उत्तर-पश्चिम विभागाच्या उपायुक्तांनी स्पष्ट केल्याची माहिती ‘एएनआय’ने दिली.
DCP North West, Delhi: Some false information/news item has been circulating regarding damage to a mosque in Ashok Vihar area. It is to clarify that no such incident has taken place in the area of Ashok Vihar. Please do not spread false information.
— ANI (@ANI) February 25, 2020
पत्रकार राणा अय्युब यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्याला तहसिन पूनावाला यांनी एएनआयच्या ट्विटचा संदर्भ देत, हा व्हिडीओ जूना असून त्याचा सीएए विरोधातील आंदोलनाचा कोणताच संबंध नसल्याचं सांगितलं. तेव्हा राणा यांनी हा व्हिडीओ काढून टाकला. त्यानंतर काल रात्री या व्हिडीओची खात्री करून त्यांनी हा व्हिडीओ पुन्हा पोस्ट केला आहे.
Re-posting this video after verifying its authenticity. It is from Delhi. Men marching on top of a mosque, vandalising it and placing a saffron flag over it. pic.twitter.com/bScgJMxKc3
— Rana Ayyub (@RanaAyyub) February 25, 2020
— Tehseen Poonawalla Official (@tehseenp) February 25, 2020
वृत्तसंस्थांची माहिती, पत्रकारांची माहिती आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे या व्हिडीओबाबत संभ्रम वाढला आहे. नेमकी कोणती माहिती खरी आहे याबाबत ‘मॅक्स महाराष्ट्र’ने शोध घेण्याचा प्रयत्न केला.
‘द वायर’ ने या संपूर्ण प्रकरणाचं सविस्तर वार्तांकन केलंय. त्यांच्या एका रिपोर्टनुसार, “मंगळवार (दि. २५) रोजी दुपारी उत्तर-पूर्व दिल्लीच्या अशोक नगर भागातील एका मशिदीला आग लागली. जळत्या मशिदीच्या भोवती "जय श्री राम" आणि "हिंदुओं का हिंदुस्तान" असा जयघोष करणाऱ्या जमावाने मशिदीवर हनुमान ध्वज ठेवला.”
याविषयी ‘मॅक्स महाराष्ट्र’ने ‘द वायर’चे पत्रकार अविचल दुबे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा दिल्लीतील अशोक नगर भागातलाच आहे. या मशिदीचं नाव बडी मस्जिद आहे.
अविचल यांनी आपल्या कॅमेऱ्यात या मशिदीचे काही फोटो आणि व्हिडीओ काढले आहेत.
It's real video of #ashoknagar in #Delhi clicked by me.@AltNews @thewire_in @svaradarajan @therealnaomib @DelhiPolice @ANI
Hanuman Flag Placed on Minaret after vandalisation of Mosque. pic.twitter.com/83ultBFi0R
— Avichal Dubey (@AvichalDubey) February 25, 2020
यासोबत ‘द वायर’च्या आणखी एक पत्रकार नाओमी बार्टन यांनीही ही मशिद दिल्लीच्या अशोक नगर भागातीलच असल्याची पुष्टी केलीय. आपण स्वतः यामशिदीवरचा ध्वज बघितला असल्याचं त्यांनी सांगितलं.
Making this very clear : I personally saw the flag on top of the miniaret of the mosque at Ashok NAGAR, not VIHAR.
The mosque had been burned, and a footwear shop underneath it was looted in front of my eyes. https://t.co/tRLTWsz6qP
— Naomi Barton (@therealnaomib) February 25, 2020
या मशिदीचा एक व्हिडीओही ‘द वायर’ने प्रकाशित केला आहे.
निष्कर्ष
काही लोक मशिदीवर चढून भगवा झेंडा लावत असलेला हा व्हिडीओ २ वर्षांपूर्वीचा आहे किंवा बिहारमधला आहे असा दावा खोटा आहे. हा व्हिडीओ दिल्लीच्या अशोक नगर भागातला असून ही घटना २५ फेब्रुवारी रोजी दुपारी घडलेली आहे.