रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू-नितेश राणे

Update: 2021-11-13 04:48 GMT

मुंबई : महाराष्ट्रात काही शहरात काल दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या सर्व घटनेच्या पाठीमागे रजा अकादमी असून तिच्यावर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशारा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिला आहे. राणे यांनी ट्विट करत हा इशारा दिला आहे.

नितेश राणे हे सध्या आक्रमक भूमिकेत दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी कालच एसटी कामगारांच्या संपावरुन देखील त्यांनी सरकारला आणि परिवहन मंत्री परब यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा रजा अकादमीकडे वळवल्याचा दिसतंय.

भाजप नेते नितेश राणे यांनी सकाळी ट्विट करत सरकार तसच रजा अकादमीला टार्गेट केलं. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रजा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शांतता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात आणि सरकार बसून राहतं, बघत बसतं. सरकारनं एक तर यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू'.

त्रिपुरात जमावानं मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्या निषेधार्थ काल ठिकठिकाणी मुस्लिम मोर्चे निघाले. त्यात अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला.याच मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी भाजपवर टीका केली होती.

Tags:    

Similar News