गर्भलिंग निदान रोखण्यासाठी राज्य तपासणी व सनियंत्रण समिती संपुर्ण राज्याचा दौरा करणार
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम २००३ च्या अंमलबजावणीसाठी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. हि राज्य तपासणी समितीच्या सदस्यांची कार्यशाळा विजया रहाटकर (अध्यक्षा, महाराष्ट्र महिला आयोग) यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाच्या कार्यालयात संपन्न झाली.
त्यावेळी बोलतांना अध्यक्षा विजया रहाटकर यांनी माहिती दिली की, “गर्भलिंग निदान रोखण्यासाठी राज्य तपासणी व सनियंत्रण समिती संपुर्ण राज्याचा दौरा करणार असुन याची सुरुवात मुलींचे लिंगगुणोत्तर कमी असलेल्या बीड, जळगाव अशा जिल्ह्यांपासुन होईल”