बाजारात विकली जाणारी अंडी प्लास्टिकची आहेत, असे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. मात्र, खरंच ही अंडी प्लास्टिकची असतात का? आपण प्लास्टिकची अंडी खातो का? यासारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. मात्र, सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रचाराबाबत नॅशनल एग्ज कॉर्डीनेशन कमिटीनं अंडी प्लास्टिकची असल्याचा केवळ अफवा असल्याचा दावा केला.
हे ही वाचा
…म्हणुन कामगारांना मारहाण केली- कप्तान मलिक
भीम आर्मीचे चंद्रशेखर अखेर ‘आझाद’
अंड्याच्या आत कवचाला चिकटलेला एक पापुद्रा असतो. हा पापुद्रा अलगदपणे कवचापासून वेगळा होतो. मात्र, जर हे अंड शिळं असेल तर हा पापुद्रा प्लास्टिकसारखा भासतो. त्यालाच लोक अंड्यामध्ये प्लास्टिक सापडल्याचं सांगतात. मात्र, प्रत्यक्षात ते खोटं आहे. ते कसं? तर अंड्याचा हा पापुद्रा ज्वालांवर पकडा. तो सहज जळत नाही. याउलट प्लास्टिक लगेच पेट घेते. त्यामुळे प्लास्टिकचं अंड ही केवळ अफवा आहे. अंड्याबाबत पसरत असलेल्या गैरसमजांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तज्ञांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचा खुलासा केला आहे.
अंड्याबाबत निर्माण झालेल्या गैरसमजातून लोक अंडी खाण्याचे टाळत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अंड्यांची मागणीदेखील घटत आहे. अन्न घटकांची पूर्तता तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून ही बाब बाधक आहे. त्यामुळे अंडी खाणाऱ्यांनी ती बिनधास्त खावीत असं मत या तज्ञांनी या पत्रकार परिषदेत मांडलं आहे. प्लास्टिक अंड्याच्या अफवांमुळे अंडी उत्पादक तसेच ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई तसेच ठाणे विभागात प्लास्टिक अंड्यांच्या नावाखाली अंडी वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्या जात आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी नॅशनल एग्ज कॉर्डीनेशन कमिटीने पुढाकार घेतला आहे. तसंच यामुळे अंडे विक्री व्यवसायात असलेल्या लोकांचं मोठं नुकसान होतंय, शेतकरीही पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटवालन करत असतात, या अफवांमुळे त्यांनाही तोटा होतोय. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानही या मोहीमेत सहभागी होत आतापर्यंत एकही अंड प्लास्टिकचं असल्याचं सिद्ध झालेलेनाही असं सांगितले आहे.