#Soyabean पावसात बुडालं आता काय करायचं?

कधी नव्हे असे सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यानं राज्यात विक्रमी सोयाबीन लागवड झाली.. पण राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीनं सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान केलं. अपेक्षित सोयाबीन उत्पादन आणि उत्पादकतेचे घट दाखवत असताना आता शेतात उभे सोयाबीन कसे वाचवायचे याविषयी सखोल मार्गदर्शन केलं आहे, डॉ. अनंत इंगळे यांनी...

Update: 2022-07-28 12:46 GMT

सोयाबीन लागवड होऊन जवळपास एक महिना पूर्ण होत आहे काही ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे, परंतु ज्या शेतकरी मित्रांनी लवकर पेरणी केली आहे त्यांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, गेली १५-२० दिवस सारखा पाऊस पडतो आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, काही ठिकाणी अजून पीक चांगली आहेत.

सुरवातीच्या काळात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत शेतकरी मित्रांना योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, अशा परिस्थितमध्ये पिकाचे नुकसान जास्त प्रमाणात होत असते कारण पीक पेरून १० दिवस झाले असताना जास्त प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल यांची वाढ कमी होते व जास्त वेळ पाणी थांबून राहिले तर मूळ कुज तसेच इतर रोगांचे प्रमाण वाढते

तण नाशक फावारणीला उशीर झाला आहे, तण नियंत्रण कसे करायचे हा शेतकरी वर्गाला पडलेला मोठा प्रश्न आहे, सोयाबीन पिकाला ३० दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर तण नाशक फवारणी टाळावी, २५ दिवासापर्यंत आपण फवारणी करू शकतो. जर वापसा असेल तर पाळी देणे आवश्यक आहे त्याने शेत कोरडे होऊन पिकाची वाढ चांगली होईल व तण नियंत्रण होईल, पाळी सुध्दा आपल्याला ३० दिवसापर्यंतच देयाची आहे, ३० दिवसानंतर पाळी देणे सुध्दा टाळावे.

पाळी देताना मातीची भर घालावी म्हणजे जास्तीचे पाणी साचून राहणार नाही.तण नाशक फवारणी करत असताना कोणतेही तण नाशक एकत्र करून फवारणी करून नये, शिफारशीत असेल तरच एकत्र करून फवारणी करावी तसेच कीटकनाशक व तण नाशक एकत्र करून फवारणी करू नये . जास्त पाऊस झाला असेल आणि सोयाबीन पिवळे पडले असेल तर अमोनियम सल्फेट द्यावे, तसेच झिंक आणि फेरस सल्फेट द्यावे

फवारणी करताना Ammonium sulphate, Zinc sulphate, फेरस सल्फेट आणि अमिनो एसिड, Cytokinine based टॉनिक चा वापर करावा तसेच अमिनो अँसिड यांचा वापर करावा. मुख्य गोष्ट म्हणजे बरेच दिवस झाले पाऊस पडतो आहे तसेच सततचे ढगाळ वातावरण असल्याने सोयाबीन, कापूस इतर पिके यांची अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही तसेच, बरेच ठिकाणी सोयाबीन पिवळी पडली आहे व वाढ अतिशय कमी झालेली दिसून येत आहे.




 


अशा परिस्थितीत जास्त प्रमाणात पाऊस पडला असल्याने मूलद्रव्ये तसेच सुक्ष अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे, अती पाऊस झाल्याने आपण दिलेले खते योग्य प्रमाणात पिकाला उपलब्ध होणार नाहीत किंवा झाली नाहीत, त्यामुळे आपलयाला आता योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, पीक ३०-३५ दिवसांचे असताना एकरी २०-२५ किलो २४:२४:० किंवा DAP किंवा १०:२६:२६ सोबत झिंक सल्फेट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिक्स करुन द्यावे. जास्तीचा पाऊस झाला असेल, तसेच चुनखडी जमीन असेल तर एकरी १५-२० किलो अमोनिअम सल्फेट टाकावे.

तसेच अशा परिस्थितीत फवारणी करताना @ Ammonium sulphate ३० gm # १९:१९:१९ किंवा १३:४०:१३ किंवा १२:६१:०० १०० gm # Zinc oxide २५ मिली किंवा झिंक / फेरस २५ gm किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये २५ gm तसेच अमिनो एसिड/ Cytokinine असलेले टॉनिक आपण वापरू शकता.

सोयाबीन पेरणी होऊन एक महिना होत आहे परंतु सतत सुरू असलेल्या पावसाने फवारणी करणे शक्य झाले नसेल तर आता लगेच फवारणी करून घ्यावी. कीटकनाशक + बुरशीनाशक यांचा वापर करावा जेणकरून चक्री भुंगा व खोड माशी यांचे नियंत्रण करता येईल. सर्व शेतकरी मित्रांनी सूचना आहे, आता पेरणी होऊन एक महिना झाला आहे त्यामुळे आता तणनाशक फवारणी करू नका. त्यापेक्षा खुरपणी करा किंवा वापसा असेल तर ३० दिवसापर्यत कोळप्याची पाळी द्या.




 


सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही कीटकनाशक फवारणी करताना २ पेक्षा जास्त active ingredient एकत्र करून फवारणी करू नका @ कोणतेही एकच कीटकनाशक फवारणी साठी वापरावे # जास्तीचे रसायने एकत्र करून फवारणी केल्यास आपल्याला चांगला रिझल्ट तर मिळत नाहीच वरून आपला खर्च वाढतो हे लक्षात घ्यावे, याप्रमाणे आत्ताच्या अती पाऊस झालेल्या परिस्थितीत व्यवस्थापन करावे.

Dr Anant Ingle

Ph.D. Genentics and Plant Breeding MPKV Rahuri

संचालक: विदर्भ शेती विकास संस्था चिखली बुलडाणा

Tags:    

Similar News