FACT CHECK | खा. अमोल कोल्हे यांची शेतकऱ्यांना मोबाईल रिचार्जची मदत?

Update: 2019-12-03 15:17 GMT

आता तुम्हाला मोबाईल रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. कोणीतरी तुमच्या मोबाईल फोनवर मदत म्हणून रिचार्ज करणार आहे, असं म्हटल्यावर तुम्ही विश्वास ठेवाल का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे साधारणपणे एका आठवड्यापासून अशाच अर्थाचा एक मेसेज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना मोबाईलला रिचार्ज करण्याची गरज नाही. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर १०२९ रुपयांचे टॉकटाईम आणि १२ जीबी इंटरनेट देणार आहेत असा दावा करण्यात येतोय.

हे ही वाचा...

मोदी काका गेले आणि नानाभाऊ आले, काय आहे या व्हिडीओ मागचं सत्य?

इंदोरच्या समस्या मांडण्यासाठी सुमित्रा महाजनांना काँग्रेसचा आधार !!!

 

सामाजिक परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून हवी : जयश्री जगदाळे

हा मेसेज चार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड केल्यानंतर हा लाभ मिळणार आहे. रिचार्ज नाही आल्यास मेसेजमध्ये दिलेल्या एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

काय आहे मेसेज?

आपल्या मोबाईल रिचार्ज करु नका कारण dr. अमोल कोल्हे यांनी आपल्या दुष्काळ गृहस्थ शेतकऱ्यांन साठी एक मदत म्हणून 12GB आणि rs 1029 टाॅक टाईम देत आहे..... केवळ हा संदेश 4 गट शेअर करा. आणि अवघ्या 2 ते 3 मिनिटात तुमची शिल्लक तपासणी (चेक करा ) Vodafone *111*6*2# airtel - *121*2# idiea - *123*10# aircel - *165*6*1# Docomo - *111*1*1# Bsnl - *112# मला देखील मोठा धक्का बसला आहे. पण हे खरे आहे............... 💐💐🙏🙏 रिचार्ज आला नाहितर कॉल करा मो नंबर... 9545758865...............................................................................................................

काय आहे सत्य?

हा मेसेज आल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने खा. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क केला. याबाबत डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे. हा मेसेज पूर्णपणे खोटा असून त्यात कसलंच तथ्य नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोणीतरी डॉ. कोल्हे यांचं नाव वापरून शेतकऱ्यांशी खोडसाळपणा केला असल्याचं डॉ. कोल्हे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

एक आठवड्यापासून हा मेसेज फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. अमोल कोल्हे यांच्या कार्यालयाकडून या मेसेजमधील फोन नंबरचा शोध घेण्यात आला. त्यांना हा नंबर राजस्थानच्या कोटा शहरातला असल्याचं समजलं. सध्या हा नंबर बंद आहे.

हा मेसेज व्हायरल झाल्यापासून मतदारसंघातील अनेक नागरिकांचे फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातूनही हा मेसेज खोटा आहे हे सांगण्यात येत आहे अशी माहिती डॉ. कोल्हे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

Similar News