"कोई भी हिन्दू वेस्टर्न हाईवे पर गोड़बंदर के होटल फाउंटेन में खाना नास्ता करने ना जावे यह होटल एक ऐसे मुस्लिम की हे जो हिन्दुओं के दम पर इतना बड़ा और पैसे वाला बना वो हिन्दुओं से सख्त नफरत करता है ओर कोई भी छोटी मोटी बात होने पर भी अपने यहां पाले हुए मुस्लिम गुंडों को तलवारों हाकी स्टिको सरियो के साथ हिन्दुओं पर अटैक करने को छोड़ देता है इस लिए सभी हिन्दुओं को निवेदन है कि इस कटुए को इसकी ओकत दिखानी है आप असली ओर सच्छे हिन्दू हो ओर इन कटुओं से नहीं डरते हो तो इस एसएमएस को इतना फैलाओ की होटल फाउंटेन बन्द हो जाए ओर इन जैसे लोगो को जो हिन्दुओं को कुछ नहीं समजते उनको अपनी ताकत दिखाओ जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र जय शिवाजी"
हा मेसेज whatsapp वर वेगाने पसरवला जातोय. सोबत एक व्हिडियो सुध्दा आहे. व्हिडीयोत दोन गटात मारामारी सुरू आहे. यामध्ये काही युवक दिसताहेत. काही महिलासुध्दा आहेत. त्यांच्या भाषेवरून कळतंय की ते मराठी आहेत. समोरचे लोक पेहरावावरून मुस्लिम दिसताहेत. प्रथमदर्शनी ही हिंदू-मुस्लिम ताणतणावाची घटना आहे, असं भासतं. व्हिडीयो सोबत फिरणाऱ्या मेसेजची भाषा चिथावणीखोर आहे.
थाने की घटना है मुल्ले हाथ मे तलवार भांज रहे है हिंदू को मारा पीटा महिलाओं को भी नही बख़्शा पुलिस तमाशा देख रही है
कँहा मर गये गरबा मे मुल्लों को शामिल करने वाले पैरोकार 👇👇👇 pic.twitter.com/ZTHlKzNSV4
— Riniti Chatterjee (@Chatterj1Asking) October 8, 2019
व्हिडीयो मीरा रोड येथील फाऊंटन हाॅटेलचा आहे. जमावातील काही महिला गाऊनवर आहेत. काही युवकही घरगुती पेहरावात आहेत. त्यामुळे लोक तिथे जेवायला आलेत आणि नंतर काहीतरी वाद झालाय, असं प्रथमदर्शनी दिसत नाही. आधी काहीतरी वादविवाद झालाय व नंतर समर्थनार्थ लोक जमा झालेत, असं लक्षात येतं.
या व्हायरल होणाऱ्या संदेसाबाबत काशिमिरा पोलिस ठाण्यातून माहिती घेतली असता, व्हिडियोत जरी हिंदू-मुस्लिम दिसत असले तरी प्रत्यक्षातला मामला हिंदू-मुस्लिम धार्मिक ताणतणावाचा नाही. घटनेला तसा रंग दिला जातोय.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सव्वा बाराच्या सुमारास दोन युवक हॉटेल फाऊंटनवर पान खाण्यासाठी (कारण निश्चित नाही) गेले होते. (लोकमतच्या बातमीत पान खाण्यासाठी गेले होते असं म्हटलंय, तर इंडियन एक्स्प्रेस च्या बातमीत जेवणासाठी आले होते, असा उल्लेख आहे.) त्यांचा हाॅटेलच्या प्रांगणात बाईक पार्क करण्यावरून तिथल्या सुरक्षारक्षकांशी वाद झाला. हा वादही नवा नाही.